पुणे- एस आर ए ने कारवाई केली कि बिल्डरने परस्पर कारवाई केली यावर कंड्या पिकत असताना आज सायंकाळी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी हि कारवाई महापालिकेनेच केली पण ती घाईगडबडीने केली असा ठपका ठेवत हा लोकांच्या जीविताशीच जोडलेला प्रश्न असल्याने इथला नाला पूर्ववत सरळ करणे ,आणि २४ मीटर रुंद करणे अत्यावश्यक असून कधी ना कधी कारवाई करायचीच होती फक्त ज्या पद्धतीने कारवाई झाली तीला नागरिकांचा विरोध होता ,त्यांना विश्वासात घेऊन दुसरीकडे घरे देऊन ती कारवाई करणे योग्य ठरते,आम्ही कोणालाही बेघर होऊ देणार नाही असे स्पष्टीकरण आणि असा विश्वास माध्यमांशी बोलताना व्यक्त केला आहे.
महापौर मोहोळ म्हणाले कि,’ आजची कारवाई जी आहे ती महापालिकेने केलेली आहे ,परंतु तीअत्यंत घाई घाईने केलेली आहे असे माझे स्पष्ट म्हणणे आहे .आपल्याला सर्वांना सप्टेंबर २०१९ ला आंबील ओढ्याला आलेला पूर आठवत असेल .जो ओढा कात्रज पासून येतो आणि या सगळ्या भागात मोठ्या प्रमाणात पाउस झाल्याने जो आजूबाजूचा परिसर बाधित झाला त्यामध्ये मनुष्यहानी ,वित्तहानी झाली .नाग्रीकांचेमोठे नुकसान झाले ,घारेच्या घरे वाहून गेली .त्यानंतर आंबील ओढ्याच्या बाबतीतला हा धोका लक्षात घेऊन एक प्लान तयार केला गेला. नाला रुंदीकरण ,खोलीकरण करणे सिमाभिंती बंधने कलवर्त ची कामे करणे अतिक्रमणे काढणे ,नाल्यातून जाणाऱ्या जलवाहिन्या ,ड्रेनेज वाहिन्या बाजूला करणे अशा अनेक बाबींचा समावेश होता .आज जिथे कारवाई झाली १९८७ च्या आराखड्यात तो जो भाग आहे तो सरळ दाखविला आहे आणि तो ८ मीटर चा २४ मीटर रुंद करणे आवश्यक होते . नाला सरळ नाही तो यु आकाराचा झाला अशा दोन कारणांनी या लोकांना स्थलांतरित करावे लागले होते. आता हि त्यांच्याच जीवाचा विचार करून त्यांना स्थलांतरित करून नाला रुंद व्हावा नैसर्गिक पाण्याचा प्रवाह तसाच सरळपणे निघून जावा म्हणून २६ मार्चला महापालिकेने जाहीर प्रगटन देखील दिले होते.
आजची कारवाई घाईने झाली हे खरे असले तरी ती ज्या पद्धतीने झाली त्याला नागरिकांचा विरोध होता ,त्यांना विश्वासात घेऊन ,योग्य संवाद साधून हे करणे आवश्यक होते. १३० घरे यात आहेत यातील एकही घर-कुटुंब बेघर होणार नाही हि जबाबदारी महापालिकेची आहे. तीआम्ही प्रशासनाला पार पाडायला भाग पाडू. ८ मीटर चा नाला २४ मीटर रुंद करणे यासाठी नागरी संवाद साधूनच काम महापालिका करेल .नाला कधी ना कधी सरळ करणे रुंद करणे गरजेचेच आहे . त्यातील आता १३० घरे आहे त्यांचा प्रश्न सोडवू .