मुंबई- पुणे, पिंपरी चिंचवड सह मुंबई, ठाणे, उल्हासनगर, नाशिक, नागपूर, अकोला, अमरावती आणि सोलापूर या १० महापालिकांसाठी २१ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. मतमोजणी २३ फेब्रुवारीला होणार आहे.
तसेच नागपूर वगळता २५ जिल्हा परिषदांच्या निवडणुका दोन टप्प्यांत होतील. पहिल्या टप्प्यात १६ फेब्रुवारी आणि दुसऱ्या टप्प्यात १० जिल्हा परिषदांसाठी २१ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. मतमोजणी २३ फेब्रुवारीला होणार आहे. राज्याचे निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी आज, बुधवारी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या तारखांची घोषणा केली. दरम्यान, निवडणुकीसाठी आजपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.
निवडणुक सर्व प्रक्रिया अर्ज ऑनलाइन पद्धतीने
सविस्तर प्रक्रिया पहा …
11 जानेवारी 2017 पासून आदर्श आचारसंहिता लागू
27 जानेवारी ते 3 फेब्रुवारीपर्यंत निवडणूक अर्ज भरता येणार
4 फेब्रुवारीला निवडणूक अर्जाची छाननी होऊन अर्ज मागे घेता येणार
5 फेब्रुवारीला निवडणूक चिन्हाचं वाटप होणार
6 फेब्रुवारी ते 19 फेब्रुवारीपर्यंत निवडणुकीचा प्रचार करता येणार
21 फेब्रुवारी रोजी मतदान होणार
23 फेब्रुवारीला मतमोजणी होणार
दहा महापालिका
मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, अकोला, अमरावती, सोलापूर, पिंपरी चिंचवड, ठाणे, उल्हासनगर
२५ जिल्हापरिषद
पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, जळगाव, अहमदनगर, अमरावती, बुलडाणा, यवतमाळ, औरंगाबाद, उस्मानाबाद, लातूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड आदींच्या निवडणुका होणार आहेत. तर नागपूर जिल्हा परिषदेबाबत न्यायालयात याचिका प्रलंबित असल्याने नागपूरचा यात समावेश नाही.