मुंबई पोलिसांनी 19 जणांवर केला गुन्हा दाखल; भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेत कोरोना नियमांचे उल्लंघन

Date:

मुंबई-राज्यभरात भाजपच्यावतीने जन आशीर्वाद यात्रा सुरु आहे. केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनीदेखील काल मुंबई विमानतळावरुन आपल्या जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात केली. दरम्यान, मुंबईत कोरोना नियमांचे उल्लघंन करत जन आशीर्वाद यात्रा काढल्याप्रकरणी 19 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये जास्तीत जास्त आयोजकांचा समावेश आहे. यात्रेदरम्यान, कार्यकर्त्यांनी सोशल डिस्टेन्सिंगचा उल्लघंन केला आहे. विशेष म्हणजे अनेक कार्यकर्त्यांनी मास्कदेखील घातले नव्हते. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली असल्याची सांगण्यात येत आहे.

केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी आपल्या जन आशीर्वाद यात्रेला मुंबई विमानतळावरुन सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी शिवाजी पार्कमधील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन आशीर्वाद घेतला असून फूल वाहिले. यानंतर शिवसेना नेत्यांमध्ये चांगलाच रोष पाहायला मिळाला. याप्रसंगी शिवसेना खासदार संजय राऊत आणि आमदार राऊत यांनी नारायण राणे यांच्या स्मृतीस्थळावर जाण्याला विरोध दर्शवला.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

रात्रीच्या वेळी एक तरुणी पोलीस ठाण्यात आली…अन महिला पोलिसानेच तिला बुधवारात पोहोचवले ..

पोलीस आणि कुंटणखाणा मालकिणीचे संगनमत - महिला पोलीस निलंबित...

मुख्यमंत्र्यांच्या आवाहनामुळे ३०५ एकरांवर होणार फळबाग व देशी वृक्षलागवड

हर्बालाइफ व फार्मर्स फॉर फॉरेस्ट यांच्यात सामंजस्य करार मुंबई, दि....

महापालिकेच्या ४ शाळांना CSR द्वारे मिळणार स्टेम लॅब

पुणे- महापालिकेच्या ४ शाळांना CSR उपक्रमांतर्गत स्टेम लॅब देण्यात...