Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

अराररारा अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘ गाणे सोशल मिडीयावर व्हायरल

Date:

मराठी, हिंदी चित्रपटामध्ये आपण अनेकदा आयटम सॉंग बघितले आहे,  त्यात अनेक नृत्यांगना, सुंदर अभिनेत्री डान्स करताना दिसतात क्वचित प्रसंगी अभिनेत्यांनी आयटम नंबर केल्याचे बॉलीवूड मध्ये उदाहरणे आहेत. मात्र तुम्ही कधी ‘भाईटम सॉंग’ बघितले आहे का? प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटात ‘अराररारा अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘ हे  भाईटम सॉंग आहे, नुकतेच ते सोशल मिडीयावर प्रदर्शित करण्यात आले असून नेटकऱ्यानी मोठ्या प्रमाणावर पसंती देत व्हायरल केले आहे.

अभिजित भोसले जेन्यूइन प्रॉडक्शन्स एलएलपी आणि पुनीत बालन एंटरटेनमेंट प्रा. लि. यांची निर्मिती असलेल्या ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ता अभिजित भोसले जेन्यूइन प्रॉडक्शन्स एलएलपी आणि किरण दगडे पाटील प्रॉडक्शन्स आहेत.

आयटम सॉंगच्याच धर्तीवर बनलेल्या भाईटम सॉंगची खासियत म्हणजे यात शहरातील सगळ्यात मोठ्या भाईचा वाढदिवस असतो आणि त्या दिवशीच्या जल्लोषावर आधारलेले हे गाणे आहे, त्यामुळे या गाण्यास खास भाई स्टाईल डान्स बघायला मिळतो.

आजवर प्रवीण तरडे हे लेखक, अभिनेता, दिग्दर्शक म्हणून सर्वांना परिचित आहेत पण या भाईटम सॉंगच्या निमित्ताने पहिल्यांदाच त्यांचा डान्स चाहत्यांना दिसणार आहे. या गाण्याचे नृत्य दिग्दर्शन उमेश जाधव यांनी केले असून नरेंद्र भिडे यांनी गाण्याला संगीत दिले आहे. आजवर अतिशय सौम्य शब्दांची गाणी लिहिणाऱ्या प्रणीत कुलकर्णी यांनी ‘अराररारा अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘ हे गीत लिहिले असून आदर्श शिंदे यांनी अफलातून गायले आहे.

चित्रपटातील हे गाणे मनोरंजन करणारे असले तरी ‘मुळशी पॅटर्न’ हा चित्रपट शेतकऱ्यांच्या मुलभूत प्रश्नावर भाष्य करताना महानगर आणि लगतच्या गावातील गुन्हेगारीचे भीषण वास्तव मांडणारा व वास्तववादी स्थिती मांडणारा आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महाराष्ट्रातील 700 मंदिरांत वस्त्रसंहिता,150 आणखी मंदिरांत नियम लागू होणार

नागपूर - महाराष्ट्रामध्ये 700 पेक्षा जास्त तर देशभरात...

राहुल गांधींचा ताफा अडवणे ही हुकुमशाही, मुलभूत अधिकारांवर घाला.

कर्नल सोफिया यांचा अपमान करणाऱ्या मंत्री विजय शाहांना तत्काळ...

“अहिल्याबाईंच्या विचारांप्रमाणे समाजासाठी न्यायदायी कार्य करण्याचा निर्धार” — उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

चौंडी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाला अभिवादन करत...