Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

महावितरणमध्ये ‘ऑनलाईन’ वीजबील भरणा तब्बल 3482 कोटींवर! मागील वर्षाच्या तुलनेत ‘ऑनलाईन’ भरणात 1561 कोटींनी वाढ

Date:

मुंबई : राज्यभरातील महावितरणच्या ग्राहकांनी आर्थिकवर्ष 2015-16 मध्ये तब्बल 3482 कोटी 58 लाख रुपयांच्या वीजबिलांचा ‘ऑनलाईन’ भरणा केला आहे. महावितरणने संकेतस्थळावरून ऑनलाईनची सुविधा उपलब्ध करून दिल्यानंतर वीजदेयकांच्या ‘ऑनलाईन’ भरणाकडे वीजग्राहकांचा कल मोठया प्रमाणात वाढत आहे. तसेच मोबाईल अ‍ॅपद्वारे वीज बिल भरणार्‍यांची संख्याही लक्षणीय आहे.

वीजग्राहकांच्या आधुनिक जीवनशैलीशी सुसंगत वीजबील भरणाची घरबसल्या सोय व्हावी यासाठी महावितरणने इंटरनेटद्वारे www.mahadiscom.in या वेबसाईटवर ‘ऑनलाईन’ बील पेमेंट सुविधा लघुुदाब वीजग्राहकांना उपलब्ध करून दिली आहे.  2014-15 मध्ये महावितरणच्या वीजग्राहकांनी 1920 कोटी 88 लाख रुपयांचा ‘ऑनलाईन’ भरणा केला होता. यातुलनेत 2015-16 मध्ये वीजग्राहकांनी तब्बल 3482 कोटी 58 लाखांचा भरणा केला आहे. वर्षभरातच ‘ऑनलाईन’ वीजबील भरणात तब्बल 1561 कोटी 70 लाखांनी वाढ झाली आहे.

वीजबिलाच्या ‘ऑनलाईन’ भरणामध्ये आघाडीवर असलेल्या पुणे, भांडूप व कल्याण परिमंडलात सन 2015-16 मध्ये तब्बल 250 ते 300 कोटी रुपयांनी वाढ झाली असून वर्षभरात पुणे-860 कोटी, भांडूप -747 कोटी तर कल्याण परिमंडलात 551 कोटी रुपयांचा भरणा झाला आहे. याशिवाय आतापर्यंत वार्षिक 90 कोटींपर्यंत ऑनलाईन भरणा होत असलेल्या नाशिक परिमंडलात 271 कोटी, नागपूर 118 कोटी, कोल्हापूर 135 कोटी, बारामती 151 कोटी आणि औरंगाबाद परिमंडलात 125 कोटी रुपयांच्या वीजबिलाचा भरणा झाला आहे.

महावितरणकडून राज्यभरातील लघुदाब वीजग्राहकांसाठी ‘ऑनलाईन’ बिल भरणासह इमेलद्वारे वीजबिलाची सेवा उपलब्ध करून दिली आहे. यात छापील कागदाऐवजी गो-ग्रीन अंतर्गत वीजबिलाच्या इमेलचा पर्याय स्वीकारल्यास दरमहा तीन रुपये सूट दिली जात आहे. तसेच छापील कागदासह इमेलद्वारेही वीजबील मिळविण्याची सोय उपलब्ध आहे. याबाबतची माहिती www.mahadiscom.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. वीजबिलाचा ‘ऑनलाईन’ भरणा करण्यासाठी क्रेडीट, डेबीट किंवा नेटबॅकींगचा पर्याय उपलब्ध असून वीजदेयक भरण्याची मुदत संपल्यानंतरही विलंब शुल्काच्या रकमेसह देयक ‘ऑनलाईन’ भरणाची सोय उपलब्ध आहे. मुदतीनंतर भरलेल्या देयकाची पावती महावितरणच्या संबंधीत कार्यालयात दाखविणे आवश्यक आहे. त्यामुळे वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई टाळता येईल. ऑनलाईन सेवा उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे ग्राहकांना त्याचा मोठा लाभ मिळत असून महावितरणच्या या सुविधांचा जास्तीत जास्त ग्राहकांनी लाभ घ्यावा असे आवाहन महावितरणने केले आहे.

मोबाईल अ‍ॅपद्वारे 19 कोटी रूपयांचा भरणा – मागील वर्षी महावितरणने मोबाईल अ‍ॅपची सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून दिली त्याचा ग्राहकांनी मोठा लाभ घेतला आहे. राज्यभरातील 2 लाख पेक्षा अधिक युजर्सनी हे अ‍ॅप डाउनलोड केले असून त्यांनी सुमारे 19 कोटी रूपयांपेक्षा अधिक रूपयांची वीज बिले भरली आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बँकॉकहून पुण्यात तस्करी:10.3 कोटींचे हायड्रोपोनिक गांजा पकडला-तिघांना अटक

पुणे-डायरेक्टरेट ऑफ कस्टम डिपार्टमेंट (डीआरआय) च्या पुणे, मुंबई शाखेतील...

भारत पाकिस्तानातील शस्त्रसंधीनंतर निर्माण झालेल्या प्रश्नांची उत्तरे केंद्र सरकारने द्यावी.

भारतीय सैन्यदलाच्या शौर्याला सलाम करण्यासाठी राजीव गांधींच्या बलिदान दिनी...