Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

महावितरणच्या वीजग्राहकांसाठी वीजमीटरची राज्यात पुरेशा प्रमाणात उपलब्धता

Date:

मुंबई:-महावितरणच्या राज्यभरातील वीज ग्राहकांसाठी नवे वीजमीटर पुरेशा प्रमाणात उपलब्ध असून कुठेही मीटरचा तुटवडा नाही. तसेच वीज मीटरचा तुटवडा जाणवू नये म्हणून महावितरणने आवश्यक उपाययोजना केल्या आहेत.

मागील काही महिन्यांत केंद्र शासन पुरस्कृत सौभाग्य योजना तसेच दिनदयाळ उपाध्याय योजनेंतर्गत मोठ्या प्रमाणात नवीन वीज जोडण्या देण्यात आल्या. तसेच संपूर्ण राज्यात जुनी इलेक्ट्रो-मेकॅनीकल मीटर व नादुरुस्त मीटर बदलविण्याची मोहीम राबविण्यात आली.  त्यामुळे काही ठिकाणी थोड्याफार प्रमाणात मीटरचा तुटवडा जाणवला होता.  परंतु आता राज्यात कुठेही मीटरचा तुटवडा नाही.

महावितरणच्या विविध कार्यालयांत सिंगल फेजचे सध्या सुमारे २ लाख ३१ हजार तर थ्रीफेजचे सुमारे १ लाख ६३ हजार नवीन मीटर उपलब्ध आहेत.  याशिवाय महावितरणने ३० लाख नवीन सिंगलफेज वीजमीटरची खरेदी केली असून पहिल्या टप्प्यात त्यातील ८९ हजार नवीन मीटर ऑगस्ट महिन्यात विविध कार्यालयांत उपलब्ध करून देण्यात आली आहेत. सप्टेंबर महिन्यात सुमारे २ लाख ६० हजार मीटर्स उपलब्ध होणार आहेत.  त्यानंतर पुढील प्रत्येक महिन्यात सुमारे ३ लाख ८० हजार नवीन वीजमीटर ग्राहकांना उपलब्ध होणार आहेत. २०१९ च्या मे महिन्यापर्यन्त हे ३० लाख मीटर महावितरणला मिळणार आहेत.

भविष्यात महावितरणच्या वीजग्राहकांना नवीन मीटरची टंचाई जाणवू नये म्हणून आणखी २० लाख मीटर नव्याने घेण्याची निविदा प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे. सर्व वर्गवारीतील वीजग्राहकांना महावितरणकडे असलेली मीटर्सची उपलब्धता महावितरणच्या www.mahadiscom.in या वेबसाईटवर  उपलब्ध करून दिली आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ल्युमॅक्स ऑटो टेक्नॉलॉजीज् विकत घेणार आयएसी ग्रुपचा भारतातील उर्वरित हिस्सा

नवी दिल्ली, १९ मे २०२५: आघाडीची टियर-१ ऑटोमोटिव्ह सिस्टम्स आणि घटक...

आंतरजातीय विवाह योजना’ बंद करणे हा एकात्मिक समाजावर प्रहार:विचारवेध असोसिएशन

पुणे :केंद्र सरकारची डॉ. बाबासाहेब आंबेडकर एकात्मिक आंतरजातीय विवाह...

युद्ध विराम म्हणताय मग विजयाचा जल्लोष कसा करताय ?मोदींना अमित ठाकरेंनी पत्र पाठवून विचारला प्रश्न

पाकविरोधात विजय मिळवला नाही.केवळ यु्द्धविराम केलाय ... मुंबई-पुणे-महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे...