Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

वीजमीटर रिडींगमध्ये हयगय झाल्यास रिडींग एजन्सीविरुद्ध फौजदारी कारवाई

Date:

 

प्रादेशिक संचालक श्री. संजय ताकसांडे यांचा इशारा

पुणे, दि. 14 : वीजग्राहकांच्या मीटरचे हेतुपुरस्सर किंवा निष्काळजीपणे सदोष रिडींग घेणाऱ्या व वीजग्राहकांना विनाकारण मनस्ताप देणाऱ्या रिडींग एजन्सीजविरुद्ध प्रसंगी फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे निर्देश महावितरणचे प्रादेशिक संचालक श्री. संजय ताकसांडे यांनी दिले.

मीटर रिडींग एजन्सीजने घेतलेल्या रिडींगचे त्याच दिवशी महावितरणकडून 5 टक्के तपासणी करून पर्यवेक्षण करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. येथील ‘प्रकाशभवन’मध्ये महावितरणचे वरिष्ठ अधिकारी व मीटर रिडींग एजन्सीजचे संचालक यांच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत प्रादेशिक संचालक श्री. ताकसांडे बोलत होते. यावेळी पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. एम. जी. शिंदे उपस्थित होते.

प्रादेशिक संचालक श्री. संजय ताकसांडे म्हणाले, की महावितरणने मोबाईल अ‍ॅपद्वारे वीजमीटर रिडींगची प्रणाली विकसीत केली आहे. पूर्वीच्या तुलनेत मीटर रिडींगची पद्धती अधिक सोयीस्कर व सोपी झालेली आहे. रिडींगमध्ये अचूकताही आलेली आहे. परंतु मीटर रिडींग एजन्सीजद्वारे अनेक ठिकाणी सदोष रिडींग घेतले जात आहे. महावितरणचे अभियंते व कर्मचाऱ्यांकडून दररोज प्रत्यक्ष 5 टक्के मीटर रिंडीगची तपासणी करून एजन्सीजने घेतलेल्या रिडींगचे पर्यवेक्षण सुरु अाहे. त्यातून हा प्रकार दिसून येत आहे. सदोष मीटर रिडींग घेतल्यामुळे महावितरणच्या महसुलाचे नुकसान होते. याशिवाय वीजबिल दुरुस्तीचा ग्राहकांनाही मनस्ताप व त्रास सहन करावा लागत आहे. यापुढे सदोष मीटर रिडींग चालू राहिल्यास संबंधित मीटर रिडींग एजन्सीविरुद्ध आर्थिक दंड, काळ्या यादीत टाकणे यासोबतच फौजदारी कारवाई करण्याचे निर्देश प्रादेशिक संचालक श्री. ताकसांडे यांनी दिले. याशिवाय महावितरणच्या अधिकार्‍यांची व कर्मचाऱ्यांनी यात हयगय व निष्काळजीपणा दिसून आल्यास त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

वीजग्राहकांना अचूक मीटर रिडींगचे वीजबिल देणे ही महावितरणची जबाबदारी आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे मीटर रिडींगची सोय उपलब्ध असताना केवळ मीटर रिडींग एजन्सीजच्या कामचुकार किंवा निष्काळजीपणामुळे वीजग्राहकांना होणारा मनस्ताप सहन केला जाणार नाही. सदोष मीटर रिडींगकडे महावितरणचे पूर्ण लक्ष आहे. रिडींग एजन्सीजने या कामात ताबडतोब सुधारणा करावी अन्यथा महावितरणच्या महसुलाशी खेळ करणार्‍या संबंधित एजन्सीविरुद्ध थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील, असे प्रादेशिक संचालक श्री. ताकसांडे यांनी बजावले.

या बैठकीत अधीक्षक अभियंता सर्वश्री सुंदर लटपटे, महेंद्र दिवाकर, राजेंद्र पवार यांच्यासह कार्यकारी अभियंते, उपविभाग कार्यालय प्रमुख, मीटर रिडींग एजन्सींजचे संचालक आदींची उपस्थिती होती.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महाराष्ट्रातील 700 मंदिरांत वस्त्रसंहिता,150 आणखी मंदिरांत नियम लागू होणार

नागपूर - महाराष्ट्रामध्ये 700 पेक्षा जास्त तर देशभरात...

राहुल गांधींचा ताफा अडवणे ही हुकुमशाही, मुलभूत अधिकारांवर घाला.

कर्नल सोफिया यांचा अपमान करणाऱ्या मंत्री विजय शाहांना तत्काळ...

“अहिल्याबाईंच्या विचारांप्रमाणे समाजासाठी न्यायदायी कार्य करण्याचा निर्धार” — उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

चौंडी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाला अभिवादन करत...