पुणे-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात अमरनाथ यात्रेकरूंच्या बसवर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा पुणे कॅम्पमधील भोपळे चौकात पुणे कॅन्टोन्मेंट भागात सर्व पक्षीय ” तीव्र निषेध ” नोंदविण्यात आला . यावेळी कार्यक्रत्यांनी पाकिस्तानच्या ध्वज दहन करून निषेध नोंदवला.
यावेळी ऍड. प्रशांत यादव , शिवसेनेचे अजय परदेशी , राजेश पुरम , अतुल गोंदकर , काँग्रेसचे विजय जाधव , राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रुपेश डाके , रणजित परदेशी , अझीम गुडाकूवाला , आर पी आयचे भगवान गायकवाड , भाजपचे शशिधर पुरम , विनायक काटकर , संजय व्हावळ , जितेंद्र शिंदे , शेखर गुजर , अशोक चेटपेल्ली , गोपाळ राठोड , दीपक आगवणे , सुधाकर संगणवार , अशोक कोठारी , लख्खन दुधारप , छत्रपती शिवाजी मार्केट मधील युसूफ बागवान , पुरुषोत्तम पिल्ले , योगेश वर्मा व अन्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते .
यावेळी ऍड. प्रशांत यादव यांनी सांगितले कि , काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात अमरनाथ यात्रेकरूंच्या बसवर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात येत आहे . पाकिस्तानला मदत करणाऱ्या चीनच्या मालावर बहिष्कार घालून कंबरडे मोडले पाहिजे .