पुणे- रेल्वे स्थानकावर मीटर टॅक्सी व मीटर रिक्षा यांना पूर्वीचा असलेला थांबा पूर्ववत देण्याची मागणी दि. पुणे टॅक्सीमेन कझ्युमर्स को ऑप. सोसायटीचे कार्यकर्ते जमील अब्दुल शेख व अंबादास सुधाकर ढगे व अब्दुल्ला अहमद शेख यांनी पुणे जिल्हाधिकारी , पुणे शहर पोलीस वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त व पुणे रेल्वेस्थानकविभागीय रेल्वे व्यवस्थापक याना निवेदनाद्वारे मागणी केली आहे .
मीटर टॅक्सी व मीटर रिक्षा प्रवासी सेवा गेल्या ७० वर्षांपासून देत आहोत आर टी ओ केंद्रीय माहिती अधिकारानुसार मीटर अधिकारानुसार मीटर टॅक्सी व मीटर रिक्षा याना रेल्वे व एस. टी. स्टँडच्या २०० मीटरच्या आत प्रवासी घेणे व उतरविणे यांच्याकरिता प्रीपेड थांबा देण्यात आला आहे . आर टी ओ च्या नियमानुसार गेले ७० वर्षांपासून चालत असलेल्या मीटर टॅक्सी व मीटर रिक्षा यांना बाहेर काढण्यात आले आहे .
मीटर टॅक्सी व मीटर रिक्षा या सर्व बँक लोनच्या गाड्या असल्या कारणाने त्यांच्या व आमच्या परिवाराचे व मुलांचे शिक्षण हे सर्व या व्यवसायावर अवलंबून आहे . गरीब मीटर टॅक्सी व मीटर रिक्षा चालक व मालकांना त्यांचा परिवाराचा उदरनिर्वाहाचा विचार करून पूर्वीच्या जागी असलेला थांबा हा ओला व उबेर या गाड्यांना बेकायदेशीरपणे त्यांच्याकडे कुठलाही परवाना नसताना देण्यात आलेला आहे . जे कायद्याने चालणारे मीटर टॅक्सी व मीटर रिक्षा याना त्यांच्या कुटुंबीयांचा व उदरनिर्वाहाचा कोणताही विचार न करता तिथून बाहेर काढण्यात आलेले असून त्यामुळे त्यांच्यावर व त्यांच्या कुटुंबियांना अन्याय करण्यात आला आहे .
शासनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्याना बाहेर काढण्यात यावे व मीटर टॅक्सी व मीटर रिक्षा यांना त्यांच्या अधिकाराचा असलेला पूर्वीचा थांबा परत देण्यात यावे अशी मागणी दि. पुणे टॅक्सीमेन कझ्युमर्स को ऑप. सोसायटीचे कार्यकर्ते जमील अब्दुल शेख व अंबादास सुधाकर ढगे व अब्दुल्ला अहमद शेख यांनी केली आहे . यावेळी इस्माईल शेख , राजू कोमकर , इम्तियाज बागवान , कैल्लास कातखडे , शाकीर अब्दुल शेख , रज्जाक शेख , असिफ मकबूल शेख , शाहबाज इब्राहिम शेख , ताजुद्दिन रशीद इनामदार , शकूर गफूर शेख , राजू मेहबूब शेख , शकील हनीफ शेख आदी उपस्थित होते .