‘वंदना चव्हाण : अनरेवेलिंग द ट्रू स्टेट्समनशिप’ ‘कॉफी टेबल बुक’ च्या चौथ्या आवृत्तीचे प्रकाशन
पुणे :
पुण्याच्या पर्यावरणप्रेमी राज्यसभा सदस्य खासदार अॅड. वंदना चव्हाण यांच्या कार्यकर्तृत्वावरील ‘प्रबोधन माध्यम प्रकाशन’ निर्मित ‘वंदना चव्हाण : अनरेवेलिंग ट्रू स्टेट्समनशिप’ या ‘यिअर बुक’ चे प्रकाशन करण्यात आले. खा. अॅड. वंदना चव्हाण, ‘प्रबोधन माध्यम प्रकाशन’च्या संचालक गौरी बिडकर आणि महापौर प्रशांत जगताप यांच्या उपस्थितीत झाले.
खासदार अॅड. वंदना चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात आज सकाळी राष्ट्रवादी शहर कार्यालयात या ‘यिअर बुक’च्या चौथ्या वर्षाच्या आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी महापौर प्रशांत जगताप, स्थायी समिती अध्यक्ष बाळासाहेब बोडके, शिक्षण मंडळ अध्यक्ष वासंती काकडे, माजी महापौर दत्तात्रय धनकवडे, वैशाली बनकर, नगरसेविका संगिता पठारे, मीनल सरोदे, आप्पा रेणूसे, विशाल तांबे, अशोक राठी, आनंद रिठे, किशोर बिटकर, आनंद अलगुडे, सर्व सेलचे पदाधिकारी, विधानसभा अध्यक्ष आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
खासदार वंदना चव्हाण यांनी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष म्हणून केलेली कामगिरी, राज्यसभा सदस्य या नात्याने केलेले अभ्यासदौरे, पर्यावरण स्नेही उपक्रम, महिला सक्षमीकरणाचे उपक्रम, शहर विकास प्रश्नावर केलेले काम याचा मागोवा या ‘कॉफी टेबल बुक’ प्रकारातील पुस्तकात घेण्यात आला आहे. ‘प्रबोधन माध्यम’च्या वतीने आयोजित या उपक्रमाचे हे चौथे वर्ष होते.
या पुस्तक मांडणीमध्ये ‘प्रबोधन माध्यम प्रकाशन’चे गौरी बिडकर, सारिका रोजेकर, सचिन सूर्यवंशी, श्रीकांत वाघ यांनी संयोजन केले.