आर पी आय युवक आघाडी पुणे शहरच्या वतीने १५ शाखांचे उद्घाटन
पुणे :जाती धर्माहुनी आहे मला मोठा देश माझा … घटना बदलायचा प्रयत्न करताल तर राहणार नाही तो तुझा … अशा शब्दांनी भाजपवर प्रहार करीत काल शहरातील ताड़ीवाला रोड परिसरात रिपब्लिकन पार्टी ऑफ़ इंडिया युवक आघाडीच्या १५ शाखांचे उद्घाटन खा.रामदास आठवले यांच्या उपस्थितीत करण्यात आले.नरेंद्र मोदी आणि पुण्याचे अनिल शिरोळे सुद्धा दलितांनी मते दिल्यामुळेच निवडून आलेत . असाही उल्लेख त्यांनी केला
“येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकी मधे मी करणार आहे विरोधी उमेदवारांवर जोरदार हल्ला, म्हणुनच गाठणार आहे हा महापालिकेचा पल्ला” अशा आपल्या खास शैलीत शब्दांनी आठवले यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली.
झोपडपट्टीत राहणारे लोक हे आपलेच असून त्यांचे सुद्धा आपल्या देशावर तेवढेच प्रेम आहे जेवढे आपण करतो या सर्व विस्थापित मतदार नागरिकांना एकत्र आणून रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारांना निवडून आणन्याचे आवाहन आठवले यांनी आपल्या भाषणात केले. या कार्यक्रमाला उपाध्यक्ष विजय गौंडर, रा.कोषाध्यक्ष एम् डी शेवाळे, प.म.सचिव अँडी जाधव प.म.अध्यक्ष परशुराम वाडेकर आदि मान्यवरांनी उपस्थिती लाऊन आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाला मोठ्या संखेने जनसमुदाय उपस्थित होता.