मौनांतर स्पर्धेत ‘ व्यक्ती, पुणे ‘ संस्थेच्या ‘घनदाट’ मूकनाट्याचा प्रथम क्रमांक
पुणे :
‘मौनांतर 2016’ या मूकनाट्य स्पर्धेत ‘व्यक्ती पुणे’ या संस्थेच्या ‘घनदाट’ मूकनाट्याने प्रथम क्रमांक मिळविला . पीव्हीजी सीओईटी, पुणेच्या ‘खिचीक्’ला द्वीतीय क्रमांक तर ‘संवर्धन संस्थे’च्या ‘संगत’ने तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळविले
या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ रविवारी सायंकाळी भरत नाट्य मंदिर येथे क्षितीज पटवर्धन, समीर विद्वांस, अनीश जोग यांच्या हस्ते झाला .
भरत नाट्य मंदिर येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ‘ड्रीम्स टू रिअॅलिटी’ आणि ‘रंगीत तालिम’,’ऐलान ‘ या पुण्यातील संस्थांच्या वतीने या मूकनाट्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. एकूण २० संघ या स्पर्धेत सहभागी झाले होते . स्पर्धेचे हे तिसरे वर्ष होते.अभिनेत्री देविका दफ्तरदार,अभिनेता गिरीश परदेशी हे या स्पर्धेचे परीक्षक होते . ढेपे वाडा ,कैलास जीवन यांच्या सहकार्याने ही स्पर्धा पार पडली
शहरी जीवनातील शौचालयाची समस्या, कुचंबणा ‘व्यक्ती पुणे’ च्या या ‘घनदाट’ मूकनाट्यात मांडलेली आहे. मिथुनचंद्र चौधरी लिखित या मूकनाट्याचे दिग्दर्शन सुयश झुंजूरके यांनी केले आहे. आदीत्य बिडकर, महेंद्र मारणे, साहिल जाधव, वैभव पांडव, तेजश्री शिलेदार, अथर्व कानगुडे यांच्यासह 20 जणांचा समावेश ‘घनदाट’ मूकनाट्यात आहे. घनदाटमध्ये प्रकाश योजना सुयश झुंजूरके यांची असून, किरण ढमाले आणि विराज देशपांडे यांनी संगीत दिले आहे.
यावेळी बोलताना परीक्षक गिरीश परदेशी म्हणाले ,’ मराठी साहित्य समृद्ध असून मूक नाटकातून कविता ,हायकू ,कथा असे मराठी साहित्य दिसण्याची गरज आहे . त्यासाठी नव्या पिढीने वाचनावर भर द्यावा ‘असे प्रतिपादन स्पर्धेचे परीक्षक गिरीश परदेशी यांनी केले . मूक नाट्य सादर करताना ‘शांतता ‘-सायलेन्स ‘ चा वापर अधिक व्हावा ‘
. लाईट्स चे वैविध्य ,रंगांचे वैविध्य उपयोगात आणले जावे . संगीताचा प्रभावी वापर हेही मूक नाट्याचे बल स्थान ठरते ‘असा सल्लाही त्यांनी दिला
प्रथमेश इनामदार म्हणाले ,’बॉक्स ऑफिस कलेक्शन वर चित्रपटांचा दर्जा ठरविला जात असताना पुण्यात बिनशब्दाच्या नाटकांची स्पर्धा होते ,हे आशादायक चित्र आहे . पावसाळ्यात एकांकिका स्पर्धा गवतासारख्या उगवत असताना ‘मौनांतर ‘ मूक नाट्य स्पर्धेने स्वतःचा ठसा उमटवत वेगळ्या संकल्पनेला रुजवले आहे ‘
कुशल खोत ,सुनील चांदोरकर ,प्रदीप वैद्य ,डॉ दीपक मांडे ,श्री भैरव ,तसेच ‘वाय झेड ‘ मराठी सिनेमाची टीम या पारितोषिक वितरण समारंभाला उपस्थित होती
माणसाच्या आयुष्यात असे काही क्षण किंवा प्रसंग ओढवतात, ज्यासमोर तो हतबल होंतो. अशाच काही परिस्थितीपैकी एक परिस्थिती म्हणजे ‘पोटात आलेली कळ’. ही कळ आल्यानंतर दोन-चार तासांमध्ये माणसाची काय अवस्था होते आणि त्याला कोणकोणत्या प्रसंगांना सामोरे जावे लागते ते ‘घनदाट’ या प्रथम पारितोषिक विजेत्या मूकनाट्यात दाखविण्यात आले आहे. विजेत्यांनी विविध घोषणा देऊन भरत नाट्य मंदिराचा परिसर दणाणून सोडला