‘हॉटेल मॅनेजमेंट अभ्यासक्रमाद्वारे विद्यार्थ्यांनी कौशल्ये विकसित करावी’ : तज्ज्ञांचे मत
पुणे :
‘हॉस्पिटॅलिटी आणि हॉटेल मॅनेेजमेंट क्षेत्राचा विकास वेगाने होत असल्याने विद्यार्थांनी हॉटेल मॅनेजमेंट अभ्यासक्रमद्वारे कौशल्ये विकसित करावीत’, असे उद्गार तज्ज्ञांनी काढले. ‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’च्या ‘एम. ए. रंगूनवाला इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अॅण्ड रिसर्च’च्या वतीने आयोजित ओरिएंटेशन प्रोग्रॅमचे आयोजन करण्यात आले होते.
या ओरिएंटेशन प्रोग्रॅममध्ये मंदार भोसले (कोर्टयार्ड मॅरिटचे विक्री व्यवस्थापक) आणि उपमन्यू बी. (‘कॉम्पास ग्रुप’चे रिजनल शेफ) यांनी विद्यार्थ्यांना उद्योगातील नैपुण्यता याविषयी मार्गदर्शन केले. हा कार्यक्रम हॉटेल मॅनेजमेंटच्या प्रथम वर्षाच्या (2016-17) विद्यार्थ्यांसाठी आयोजित केला होता. यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्य अनिता फ्रांन्स यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. हा ओरिएंटेशन प्रोगॅ्रम ‘हायटेक हॉल’ येथे आयोजित करण्यात आला होता.
या ओरिएंटेशन प्रोग्रॅममध्ये एकूण 150 विद्यार्थी व पालक सहभागी झाले होते.
पालकांनी तज्ज्ञांकडून हॉस्पिटॅलिटी आणि हॉटेल मॅनेेजमेंट क्षेत्राचे महत्व समजून घेतले. या ओरिएंटेशन प्रोग्रॅममुळे विद्यार्थ्यांना आणि पालकांना उद्योग आणि करिअरविषयी उपयुक्त माहिती मिळाली.