Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

मथुरेत ‘कृष्ण’ कमी, ‘कंस’च जास्त-वाढत्या गुन्हेगारीबद्दल खासदार हेमामालिनी चिंताग्रस्त

Date:

मथुरा -खासदार हेमा मालिनी यांनी मुथरेतील वाढत्या गुन्हेगारीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांवर बोलताना भाजप खासदार हेमा मालिनी यांनी ऐतिहासिक संदर्भ दिला. ‘मथुरेत आता कृष्ण कमी आणि कंसच जास्त आहेत,’ असे हेमा मालिनी यांनी म्हटले. हेमा मालिनी यांनी गुन्हेगारीच्या वाढत्या घटनांबद्दल उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली.

‘मथुरेत गुन्हेगारीच्या घटना इतक्या मोठ्या प्रमाणात वाढतील, याचा मी कधीच विचार केला नव्हता. मथुरा ही भगवान कृष्णाची नगरी असल्याने मी येथे आले होते. येथीस कणाकणात कृष्णाचे वास्तव्य आहे. मात्र आता मथुरेत कृष्णापेक्षा कंसांची संख्या जास्त आहे. पूर्वी असे नव्हते,’ असे भाजप खासदार हेमा मालिनी यांनी म्हटले. मथुरेतील सराफा बाजारात १५ मे रोजी दोन व्यापाऱ्यांची हत्या करण्यात आली होती. यावेळी कोट्यवधींचा ऐवजदेखील लंपास करण्यात आला. हत्या करण्यात आलेल्या दोन व्यापाऱ्यांच्या कुटुंबियांची हेमा मालिनी यांनी भेट घेतली. यावेळी हेमा मालिनी यांनी दोन्ही कुटुंबियांना न्याय मिळेल, असे आश्वासन दिले.

मथुरेतील कायदा सुव्यवस्थेच्या मुद्यावरुन हेमा मालिनी यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. मथुरेतील व्यापाऱ्यांना अधिक सुरक्षा पुरवण्यात यावी, अशी मागणी हेमा मालिनी यांनी योगी आदित्यनाथ यांच्याकडे केली. ‘मी खासदार होण्यासोबतच एक स्त्रीदेखील आहे. त्यामुळेच या घटनेने मला दु:ख झाले आहे. या दुर्घटनेमुळे दोन्ही व्यापाऱ्यांच्या कुटुंबाचा आधार हिरावला गेला आहे. घटनेची माहिती मिळाल्यापासून मी पीडित कुटुंबियांच्या संपर्कात आहे,’ असे हेमा मालिनी यांनी सांगितले.

१५ मे रोजी हत्या आणि लुटीच्या घटना घडल्यानंतर पाच जखमी व्यापारी आणि कारागिरांना तातडीने उपचार मिळू शकले नाहीत. याबद्दल बोलताना, ‘मथुरेच्या रुग्णालयात डॉक्टरच नसतात, ही बाब लक्षात आली आहे,’ असे हेमा मालिनी यांनी म्हटले. ‘घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या व्यापाऱ्यांच्या कुटुंबियांनी त्यांना वेळेवर स्ट्रेचर न मिळाल्याची माहिती दिली. रुग्णालयात पोहोचल्यावर तेथील आपत्कालीन विभागातील वीजपुरवठा खंडित झाला. यासाठी पर्यायी व्यवस्थादेखील उपस्थित नव्हती,’ असेदेखील हेमी मालिनी म्हणाल्या.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ट्रेलरमधील सळ्या केबिनमध्ये घुसल्या, चालकाचा दुर्दैवी अंत

पुणे-पुण्यात अवजड वाहनांकडून होणाऱ्या अपघातांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे....

नवी मुंबईतील कंपनीत गॅस गळती:कामगारांवर कार्बन मोनॉक्साईडचा परिणाम, 25 महिला बेशुद्ध

नवी मुंबईतील एका कंपनीमध्ये गुरुवारी सकाळी गॅस गळतीची घटना...

PMRDA आयुक्त यांच्या हस्ते क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

पिंपरी : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या दहाव्या वर्धापन...