पुणे- महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेना, पिंपरी चिंचवड व पुणे शहरातर्फे ‘नवनिर्माण लघुपट महोत्सव २०१६’ आयोजित करण्यात आला आहे. दिनांक १७ जुलै २०१६ ते २७ जुलै २०१६ ह्या कालावधीत इच्छुकांनी लघुपटांचे प्रवेश अर्ज एम ओ व्ही फोर्मेट मधील डीव्हीडीसह आयोजकांकडे जमा करावेत . १९ अॉगस्ट रोजी निवडक लघुपट मराठी चित्रपट सृष्टीतील मान्यवरांच्या उपस्थितीत दाखवले जाणार आहे. तसेच दिमाखदार या सोहळ्यात प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाच्या लघुपटांना रोख रक्कम व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे तसेच उत्तेजनार्थ पारितोषिकांचे वितरण करण्यात येणार आहे.मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा होणार आहे. अशी माहिती मनसे चित्रपट सेने चे पुणे आणि पिंपरी शहर अध्यक्ष कुणाल निंबाळकर ,आणि दीपक चव्हाण यांनी येथे दिली .अधिक माहितीसाठी संपर्क करा :दिपक चव्हाण (पिंपरी चिंचवड)9922425184; कुणाल निंबाळकर (पुणे) 9922157137 या क्रमांकावर संपर्क साधावा असेही जाहीर करण्यात आले आहे .