पुणे – महाराष्ट्र सरकारने नुकतेच जाहीर केलेल्या एकच लक्ष दोन कोटी वृक्ष या उपक्रमात योगदान देण्यासाठी बांधकाम क्षेत्रातील आघाडीची कंपनी मित्तल ब्रदर्स कडून 2000 वृक्षांचे रोपण करण्यात आले आहे.हे वृक्षारोपण मित्तल ब्रदर्स कंपनीच्या हिंजेवडी मधील हाय माउंट या गृह प्रकल्पामध्ये करण्यात आले. यावेळी मित्तल ब्रदर्सचे संचालक पवन आणि दिलीप मित्तल आणि विविध आयटी कंपनीमधील कर्मचारी उपस्थित होते.या उपक्रमात सहभागी होण्यासाठी इन्फोसिस, ग्लोबेन्ट, विर्पो, सिनर्कोन, अक्वाटेक, एल अण्ड टी आणि रूबी हॉल क्लिनिक या विविध शहरातील नामांकित आयटी कंपनीमधील लोकं सहभागी झाले होते.बदलते वातावरण लक्षात घेता पर्यावरणात समतोल साधण्यासाठी मित्तल समुहाकडून त्यांच्या प्रत्येक प्रकल्पामध्ये अशा प्रकारच्या उपक्रम घेण्यात येईल, अशी महिती मित्तल ब्रदर्सचे संचालक पवन मित्तल यांनी याप्रसंगी दिली.ते पुढे म्हणाले की, वृक्षारोपणासोबतच आमचा प्रत्येक गृह प्रकल्पामध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम बसविण्यात आली आहे. यामुळे पाणी टंचाई, बदलते हवामान यासारख्या नैसर्गिक समस्यांमध्येही आमच्या गृह प्रकल्पामधील लोकांना त्रास होणार नाही.व्दारका प्रसाद मित्तल यांनी मित्तल समुह स्थापन केला असून गुणवत्ता, बांधिलकी आणि विश्वास या गुणांच्या आधारावर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये ही कंपनी काम करत आहे.