संजय राऊतांच्या धमकीप्रकरणात पुण्यातून एक आरोपी ताब्यात

Date:

पुणे-खासदार संजय राऊत यांच्या धमकीप्रकरणात पुण्यातून एका तरूणास पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.राहुल तळेकर( वय -23 ,रा. वडगाव शेरी, पुणे) असे या तरुणाचे नाव असून पुणे पोलिसांनी त्यास पुढील तपास करण्याकरता मुंबई पोलिसांच्या स्वाधीन केल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांनी येथे माध्यमांना दिली आहे. संजय राऊतांना लॉरेन्स बिष्णोई या कुख्यात टोळीच्या नावाने धमकीचा मेसेज आला होता. खराडी चंदननगर परिसरातून एका हॉटेल मधून राहुल तळेकर यास ताब्यात घेतले आहे. तळेकर हा एका हॉटेलमध्ये काम करत आहे. त्याने अशाप्रकारचे कृत्य कशासाठी केले आहे, तसेच त्याचा लॉरेन्स बिष्णोई टोळीशी नेमका काय संबंध आहे, याबाबतचा तपास पोलिस करत आहे.

खासदार संजय राऊत यांना पंजाब ,हरियाणा मध्ये वर्चस्व असलेल्या लॉरेन्स बिष्णोई टोळीकडून जीवे मारण्याचा धमकीचा मेसेज आलेला होता. या प्रकरणात पोलिसांनी तपास सुरू केला होता. त्याचसोबत राऊत यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती. मुंबई पोलिसांना तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे काही धागेदोरे मिळाले होते. त्यानुसार एक संशयित पुण्यात असल्याची माहिती त्यांनी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेस कळवली होती.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

नाले सफाई, ड्रेनेज सफाई बाबत हलगर्जीपणा खपवून घेणार नाही – महापौरांचा इशारा

पुणे- पावसाळ्यात नाले सफाई आणि ड्रेनेज सफाई न झाल्याने...

वंचित विशेष मुलांसाठी मामाच्या गावची सफर-सेवा मित्र मंडळ ट्रस्टतर्फे आयोजन

पुणे : दरवर्षीप्रमाणे मामाच्या गावाला जाण्याची ओढ आणि एकदा...

सत्कारासाठी पुष्पगुच्छाऐवजी झाडाचे रोप द्यावे-शशिकांत कांबळे यांची मागणी; 

 पद्मा फाउंडेशनतर्फे महापौर, महापालिका आयुक्तांना निवेदन पुणे: विविध सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये...