रांका ज्वेलर्सला 1 कोटीचा गंडा

Date:

पुणे : पुण्यातील प्रसिद्ध रांका ज्वेलर्स मधील काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनीच मालकाची फसवणूक केली आहे. रांका ज्वेलर्स पेढीतील लेखापालांकडून एक कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी लेखापाल अमन ओझा, देव नारायण दुबे यांच्या विरुद्ध फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील रविवार पेठेतील रांका ज्वेलर्सच्या शाखेत 10 सप्टेंबर 2020 ते 7 फेब्रुवारी 2023 या कालावधीत हा प्रकार घडला आहे. अमन ओझा आणि देव नारायण दुबे सराफी पेढीत लेखापाल आहेत. दोघांनी सराफी पेढीचे खाते असलेल्या बँकेच्या धनादेशावर व्यवस्थापकांच्या नावाने बनावट सह्या केल्या. अनोळखी व्यक्तींच्या नावावर त्यांनी बिल तयार केले. त्यानंतर धनादेश अनोळखी व्यक्तीच्या खात्यावर जमा करुन ओझा आणि दुबे यांनी पैसे काढून घेतले. दोघांनी एक कोटीहून अधिक रक्कम काढली. दरम्यान, ओझा आणि दुबे यांनी महिनाभराच्या अंतराने नोकरी ही सोडून दिलीहा सगळा प्रकार लक्षात आल्यानंतर संस्थेच्या व्यवस्थापकांना शंका आली. त्यांनी धनादेशाची पाहणी केली असता धनादेशावर देशपांडे नामक यांची बनावट सही असल्याचे आढळून आले. त्यानंतर देशपांडे यांनी गेल्या दोन वर्षातील हिशोब तपासला. त्या वेळी दोघांनी देशपांडे यांची बनावट सही करुन फसवणूक केल्याचे उघडकीस आले. यानंतर देशपांडे यांनी पोलिसात धाव घेतली. पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे.पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालले आहे. रांका ज्वेलर्सच्या एक कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची घटना समोर येताच मोठी खळबळ उडाली आहे पुणे शहरात रांका ज्वेलर्सच्या विविध भागात शाखा आहेत. ही घटना रविवार पेठेतील रांका ज्वेलर्सच्या शाखेत घडली आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बीआरटी मध्ये 20 वर्षात जनतेचे 1100 कोटी वाया घालवण्याचे श्रेय कुणाचे?

कारभाऱ्यांच्या अपयशाचे स्मारक म्हणून एक बसस्टॉप चे जतन करावे:...

आरक्षण उप वर्गीकरणाला परिषदेचा विरोध – ॲड. जयदेव गायकवाड

वर्गीकरणाच्या नावाखाली वाद निर्माण केले जात आहेत - ॲड....

एमपीएससीच्या कारभारात पारदर्शकता, भरतीला गती आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळावा यासाठी विधानपरिषदेत डॉ. नीलम गोऱ्हेंची यांची जोरदार मागणी

एमपीएससीने विद्यार्थ्यांशी थेट संवादाबरोबरच वेळबद्ध भरती, पारदर्शक परीक्षा प्रक्रिया...