कामात हयगय कराल तर अधिकाऱ्यांवरही कारवाई; महापालिका आयुक्तांचा थेट इशारा!

Date:

पदपथांवरील अतिक्रमणे तातडीने हटविण्याचे निर्देश; धार्मिक स्थळांशी संबंधित प्रश्नांसाठी लवकरच स्वतंत्र बैठक

पुणे : शहरातील स्वच्छता आणि अतिक्रमणविरोधी मोहिमेबाबत महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी कठोर पवित्रा घेतला आहे. महापालिकेच्या दैनंदिन कामकाजात निष्काळजीपणा अथवा हयगय आढळल्यास संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.

शनिवारी (दि. २८ नोव्हेंबर) महापालिका आयुक्तांनी सिंहगड रस्त्यावरील रामकृष्ण मठ परिसर तसेच कसबा-विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील विविध ठिकाणांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी स्वच्छता आणि अतिक्रमणविषयक कामकाजाचा आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.

पदपथ पादचाऱ्यांसाठी मोकळे करा!

सार्वजनिक पदपथांवरील अतिक्रमणे तातडीने हटवून ते पादचाऱ्यांसाठी मोकळे ठेवण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. परिसराची नियमित स्वच्छता राखण्याबरोबरच दैनंदिन कामकाजात कोणत्याही प्रकारची हयगय होणार नाही, याची दक्षता घेण्यासही त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.

धार्मिक स्थळांबाबत स्वतंत्र बैठक होणार

धार्मिक स्थळांशी संबंधित विषयांवर लवकरच स्वतंत्र बैठक घेण्यात येणार असून, त्यामध्ये पुढील कार्यवाहीची दिशा निश्चित केली जाईल, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.

आता अधिकाऱ्यांचीही जबाबदारी निश्चित

शहरातील स्वच्छता, सार्वजनिक जागांचे व्यवस्थापन आणि अतिक्रमणमुक्त पदपथ यांना प्राधान्य देऊन संबंधित विभागांनी जबाबदारीने आणि तत्परतेने काम करावे. कामकाजात निष्काळजीपणा आढळल्यास संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांवरही आवश्यक ती कारवाई करण्यात येईल, असा इशारा आयुक्तांनी दिला.

अतिक्रमणांविरोधात शहरभर सुरू असलेल्या धडक कारवाईच्या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी आता प्रत्यक्ष पाहणीसह प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या जबाबदारीवरही भर दिला आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मसापमध्ये नेतृत्वबदलाचे वारे; अध्यक्ष योगेश सोमण यांच्याविरोधातील अविश्वास ठराव मंजूर झाल्याचा दावा!

कार्यकारी मंडळाच्या २१ सदस्यांनी दाखल केला होता अविश्वास ठराव;...

भाजप नेत्यांचे लाडके शुभारंभ लॉन्सलाही तडाखा; डीपी रोडवर तब्बल २ लाख ३९ हजार चौरस फुटांवरील अतिक्रमणे हटविली!

नदीकिनाऱ्यावरील बड्या लॉन्स आणि हॉटेल्सवर महापालिकेची धडक कारवाई; दिवंगत...

देश तोडण्याचा भाजपचा कट; सुप्रिया सुळेंच्या पक्षाने पाठिंबा दिल्यास तो संविधानाचा अपमान ठरेल : प्रणिती शिंदे

मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावरून भाजपसह शरद पवार गटावर घणाघाती टीका;...

पुण्यात दुकानासमोर, रस्त्यावर कचरा टाकाल तर लाखाचा दंड; वारंवार नियम मोडल्यास दुकान सील, फेरीवाल्यांचा परवाना रद्द!

महापालिकेचा कठोर पवित्रा; दुकानदार, फेरीवाले आणि मंडई व्यावसायिकांसाठी स्वच्छतेचे...