रेल्वेतील महिला सुरक्षेचा डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतला आढावा; नायगाव व कल्याण प्रकरणांचा पाठपुरावा

Date:

डॉ. गोऱ्हे यांच्या सूचनेनंतर पॅनिक बटन, टॉकबॅक आणि CCTV यंत्रणेची कार्यपद्धती तपासण्यासाठी आयुक्त कलासागर मोटरमनसोबत स्वतंत्र बैठक घेणार

मुंबई, दि. २० नोव्हेंबर २०२६ : नायगाव आणि कल्याण रेल्वे प्रकरणांचा पाठपुरावा तसेच महिला व दिव्यांग प्रवाशांच्या सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत शिवसेना नेत्या तथा महाराष्ट्र विधानपरिषदेच्या माजी उपसभापती आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज रेल्वे पोलीस आयुक्त श्री. राकेश कलासागर आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली.

महिला व दिव्यांग प्रवाशांच्या डब्यांतील पॅनिक बटन, टॉकबॅक बटन आणि CCTV यंत्रणा प्रत्यक्षात कशी कार्यरत आहे, याचा आढावा घेण्याची सूचना डॉ. गोऱ्हे यांनी केली. पॅनिक बटन दाबल्यावर संदेश मोटरमन, ट्रेन मॅनेजर, RPF आणि GRP यांच्यापर्यंत कसा पोहोचतो, तसेच टॉकबॅक यंत्रणेतून आलेल्या संदेशावर तातडीने मदत कशी पाठवली जाते, हे तपासण्यासाठी रेल्वे पोलीस आयुक्त कलासागर मोटरमनसोबत स्वतंत्र बैठक घेणार आहेत. डब्यांतील CCTV दृश्ये कशी पाहिली जातात आणि आवश्यकतेनुसार ती तपास यंत्रणेला कशी उपलब्ध होतात, याची माहितीही या बैठकीत घेतली जाणार आहे.

नायगाव प्रकरणातील पीडित तरुणीची प्रकृती स्थिर असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. डॉक्टरांच्या निरीक्षणानंतर कृत्रिम हाताबाबत निर्णय घेतला जाईल. तिच्या उपचार, आर्थिक मदत आणि पुनर्वसनासाठी रेल्वे प्रशासन व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत पाठपुरावा करण्याबाबत बैठकीत चर्चा झाली.शिवसेनेच्या वैद्यकीय मदत कक्षा तर्फे मदत ऊपलब्ध करून देण्यीबाबत प्रयत्न करण्याची प्रयत्न करणार असल्याचे जितेंद्र सपकाळ यांनी सांगितले .

कल्याण रेल्वे यार्डातील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणातील पीडितेला अद्याप आर्थिक मदत मिळाली नसल्याबद्दल डॉ. गोऱ्हे यांनी खेद व्यक्त केला. मनोधैर्य योजनेतील मदतीसह पीडितेला मिळू शकणाऱ्या इतर सहाय्याचा पाठपुरावा महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण आणि जिल्हाधिकारी आणि जिल्हा पातळीवरील संबंधित यंत्रणांकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कल्याण रेल्वे यार्डातील धोकादायक इमारती हटवणे, सर्चलाईट व CCTV बसवणे आणि रेल्वे व राज्य पोलिसांची संयुक्त गस्त याबाबत यापूर्वी दिलेल्या सूचनांवरील कार्यवाहीचा सद्यस्थिती अहवाल देण्यास सांगण्यात आले. कल्याण परिसरातील महिलांची सुरक्षा आणि मानवी तस्करीचा संभाव्य धोका लक्षात घेऊन यार्ड व स्थानक परिसराचा आढावा घेण्याची गरजही डॉ. गोऱ्हे यांनी मांडली.

रेल्वे स्थानकांशी संलग्न महिला दक्षता समित्या सक्रिय करणे, त्यांची अद्ययावत सदस्य यादी तयार करणे आणि पीडित महिलांना तातडीने मदत व दिलासा मिळण्यासाठी कार्यपद्धती ठरवणे यावर चर्चा झाली. अधिकाऱ्यांनी रात्रीच्या वेळी महिला डब्यांमध्ये सुरक्षा कर्मचारी तैनात असल्याची माहिती दिली. प्रत्यक्ष तैनातीची पडताळणी करण्यासाठी ट्रेननिहाय माहिती मागविण्यात आली. निवडक लांब पल्ल्याच्या गाड्यांमधील सुरक्षा गस्तीचा तपशीलही देण्यास सांगण्यात आले.

या बैठकीस पोलीस उपायुक्त सुनीता ठाकरे , सहाय्यक पोलीस आयुक्त मनीषा रावखांडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणपत तुबडा, अश्विनी पाटील यांच्यासह शिवसेना नगरसेविका वनिता नरवणकर (वरळी), नीलम पवार (मलबार हिल विभागप्रमुख), जितेंद्र सपकाळ (शिवसेना वैद्यकीय सेवा कक्ष), सोनल सोलंकी (चरेतरोके समाज महिला अध्यक्षा, खडकपाडा, कल्याण), रोहिणी खंडागळे (वरळी विधानसभा समन्वयक), दीपाली शिंदे (शाखाप्रमुख), समिधा कोळी (शाखाप्रमुख, मलबार हिल), जमना चव्हाण आणि नीरू सोलंकी उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

शेड पाडल्या, पण अनधिकृत व्यवसाय सुरूच! महापालिकेची अतिक्रमण कारवाई केवळ दिखावा ठरणार?

फ्रंट व साईड मार्जिनमधील अनधिकृत व्यवसायांवर फौजदारी कारवाई करा;...

माजी आमदार मोहन जोशी यांची अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सचिवपदी नियुक्ती

कर्नाटकच्या सहप्रभारीपदाची जबाबदारी पुणे : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ...

अतिक्रमणांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांचीही नावे जाहीर करा; रवींद्र साळेगावकरांची महापालिका आयुक्तांकडे मागणी!

नगरसेवकांवर कारवाईचा इशारा स्वागतार्ह; मात्र अतिक्रमणांकडे डोळेझाक करणारे क्षेत्रीय...