बनावट वव्हिडीओ प्रसारित करण्याची दिली होती धमकी
मुंबई-प्रसारमाध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आरोपींनी मुंबईच्या एका जुन्या पोलिस आयुक्तांचे नाव घेतले. अनेक मोठ्या लोकांची नावे घेतली. तो व्यक्ती सापडल्यास हा कट उघड होईल. पोलिसांनी छापेमारी केली आहे. कारवाई सुरू केली आहे. मला वाटते की, जुन्या सरकारकडून जे प्रयत्न सुरू होते. त्यात एक नवा प्रयत्न समोर आला आहे.देवेंद्र फडणीस म्हणाले, मी सभागृहात निवेदन केले आहे. राजकीय कट आहे की, नाही हे लवकरच कळेल. इतक्या वेगवेगळ्या लोकांचे नावे घेतले आहेत की, ते प्रायव्हेटली सांगतात की यांनी सांगितले. नंतर मेसेज पाठवात तुम्ही सांगेल त्याचे नाव घेऊ. मात्र, पुरावा असल्याशिवाय त्यांच्यावर विश्वास ठेवणे योग्य नाही. त्यांनी अनेकांची नावे घेतली आहेत. ते तपास झाल्याशिवाय हे समोर येणार नाही.देवेंद्र फडणीस म्हणाले, पुढे म्हणाले की, जोपर्यंत हाती येत नाही, तोपर्यंत बोलणार नाही. आरोपत्रात खूप काही समोर येईल. काही फॉरेन्सिक रिपोर्ट आलेत. काही यायचे आहेत. सर्व काही बाहेर येईल. मी खूप जबाबदार नेता आहे. कोणाताही पुरावा हाती आला की नाव घेईन. तुम्ही आता कितीही प्रश्न विचारा हातात काहीही नसताना मी कोणाचेही नाव घेणार नसल्याचे ते म्हणाले.