पुणे-डॉ.भगवान अंतू पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे यांची आरोग्य प्रमुख पुणे महानगरपालिका, पुणे येथे नियुक्तीने रुजू झाल्याने आयुक्त, आरोग्य सेवा यांचे मान्यतेने संचालक, आरोग्य सेवा, मुंबई यांच्या आदेशान्वये डॉ. रामचंद्र शिवराम हंकारे यांच्याकडे जिल्हा आरोग्य अधिकारी. जिल्हा परिषद, पुणे या पदाचा अतिरीक्त कार्यभार सुपूर्द करणेत आलेला आहे.सहा संचालक. (कुटुंब कल्याण ), अति. संचालक (कु.क). आरोग्य सेवा, पुणे या पदावर देखीलते काम पाहत आहेत .
आज दिनांक १६/०३/२०२३ रोजी आयुष प्रसाद (भा.प्र.से.) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे यांचे सूचनेनुसार अति. मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे व उपमुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि) राहूल गावडे यांचेकडे जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे या पदावर डॉ. रामचंद्र शिवराम हंकारे रुजू झाले.
डॉ. रामचंद्र हंकारे यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी वउपमुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि) यांनी स्वागत केले तसेच आरोग्य विभागामार्फत डॉ. रामचंद्र हंकारे यांचे डॉ. विजयकुमार वाघ, अति. जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ. अभय तिडके, अति. जिल्हा आरोग्य अधिकारी आणि सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी स्वागत केले.डॉ. रामचंद्र शिवराम हकारे, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे पदाचा कार्यभार स्वीकारून आरोग्य सेवेबाबत पुणे जिल्ह्याचे नावलौकीक वाढविणे करीता आश्वासीत केले.