दीड वर्षे ती घरी येत होती ….
मुंबई-उपमुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना तब्बल 1 कोटी रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न झाला आहे. हे प्रकरण आज अधिवेशनात उपस्थित करण्यात आले. यावेळी उपमुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत सारा घटनाक्रम सांगितला.विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज अर्थसंकल्पीय अधिवेशनात याबाबत प्रश्न उपस्थित केला. अजित पवार म्हणाले, द इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्रामध्ये पहिल्याच पानावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी म्हणजेच त्यांची धर्मपत्नी अमृता फडणवीस यांच्यासंदर्भात एक बातमी आली आहे. आम्हाला सभागृहाला माहिती हवी आहे की या प्रकरणात सत्यता काय आहे. सर्वांना समजले पाहिजे की, हे नेमके काय प्रकरण आहे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
अजित पवारांनी विचारलेल्या प्रश्नासाठी देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाचे आभार मानले. ते म्हणाले, मला याबाबत वस्तुस्थिती मांडता येईल. माझ्या पत्नीने अशा प्रकारचा एक एफआयआर फाईल केला आहे की, तिच्यावर दबाव आणून माझ्या माध्यमातून काही काम करुन घेण्यासाठी प्रयत्न झाला. पहिल्यांदा पैसे ऑफर करण्यात आले. त्यानंतर ब्लॅकमेल करण्यात आले.पुढे देवेंद्र फडणवीस म्हणाले, अज्ञात नंबर वरुन व्हिडीओ, काही क्लिप आल्या. या व्हिडीओमध्ये अत्यंत गंभीर व्हिडीओ दिसला. त्यामध्ये ती मुलगी बॅगेत पैसे भरते आणि ती बॅग आमच्या घरी काम करणाऱ्या बाईला देते आणि त्यासोबत धमक्या पाठवण्यात आल्या. माझे सर्व पक्षांशी संबंध आहेत. यामुळे तुमच्या नवऱ्याची नोकरी जाऊ शकते. असे सांगण्यात आले.देवेंद्र फडणवीस म्हणाले, मला फसवण्याचा प्रयत्न झाला. माझ्या कुटुंबीयांविरोधातही काहीतरी सुरु होते. लोक मला याबाबत सांगायचे. मात्र ईश्वराची आमच्यावर कृपा आहे. तो व्यक्ती हातात आला असता तर सर्वकाही समोर आले असते. त्या व्यक्तीचे मोठ्या व्यक्तींसोबत, नेत्यांसोबत संवादाच्या ऑडिओ क्लिप पाठवण्यात आल्या.
काय आहे नेमके प्रकरण?
अमृता फडणवीस यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटल्याप्रमाणे, अनिक्षा आणि त्यांची नोव्हेंबर 2021 साली पहिल्यांदा भेट झाली होती. अनिक्षाने सांगितले की, ती कपडे दागिन्यांची डिझायनर आहे. तिने डिझाईन केलेले कपडे आणि दागिने सार्वजनिक कार्यक्रमात घालावे अशी विनंती केली होती. यानंतर सागर बंगला आणि विविध कार्यक्रमात अनिक्षाशी भेट झाली, असेही अमृता म्हणाल्या.पुढे बोलताना अमृता फडणवीस म्हणाल्या, 27 जानेवारी 2023 रोजी पुण्यातल्या एका कार्यक्रमात अनिक्षा तिथे भेटली. कार्यक्रम झाल्यावर अनिक्षाला कारमध्ये बसवले. तेव्हा बोलताना अनिक्षाने म्हटलं की, तिचे वडील पोलिसांना बुकींबाबत माहिती देत होते. त्यानुसार, पोलिसांना सट्टेबाजांवर कारवाईच्या सूचना देऊन पैसे कमवू शकतो. कारवाई न करण्यासाठीही सट्टेबाजांकडून पैसे घेऊ शकतो. यानंतर अनिक्षाला कारमधून खाली उतरवले, असे तक्रारीतही म्हटले आहे.