गांधी-नेहरू यांच्या विचारांमुळेलोकशाही आजही मजबूत-रमणिक मुनीजी महाराजसाहेब

Date:

पुणे : महात्मा गांधींनी घडविलेली अहिंसक मने आणि द्वेष भावना न ठेवता पंडित नेहरू यांनी केलेली भारताची उभारणी यामुळेच येथील लोकशाही आजही मजबूत आहे, असे प्रतिपादन रमणिक मुनीजी महाराजसाहेब यांनी केले.

पंडित जवाहरलाल नेहरू जयंतीनिमित्त शिवशंकर सभागृहात ‘महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू आणि आपण’ या विषयावर रमणिक मुनिजी महाराजसाहेब यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या विचारांचा तसेच भारताच्या लोकशाही आणि उदारमतवादी परंपरेचा ऊहापोह रमणिक मुनीजी महाराजसाहेब यांनी आपल्या ओघवत्या शैलीत केला.

भगवान महावीरांनी सांगितलेली अहिंसा, सत्य, अपरिग्रह आणि अनेकांतवाद ही तत्त्वे गांधीजींनी आपल्या आचरणातून जगासमोर ठेवली, तर त्यांचे वैचारिक उत्तराधिकारी नेहरूंनी ‘सत्यम् शिवम् सुंदरम्’ या मूल्यांच्या प्रेरणेतून आधुनिक भारताच्या निर्मितीला दिशा दिली, असे सांगून ते म्हणाले, भारतासोबत अनेक देश स्वतंत्र झाले; मात्र त्यापैकी अनेक देशांत लोकशाही व्यवस्था टिकू शकली नाही. भारताची लोकशाही आजही मजबूत आहे, यामागे गांधीजींनी घडवलेली अहिंसक मने आणि नेहरूंनी द्वेषभावना न ठेवता केलेली आधुनिक भारताची उभारणी ही महत्त्वाची कारणे आहेत.

द्वेष आणि हिंसेला घाबरून आपणही समोरच्यासारखे न होता, अहिंसा आणि प्रेमाच्या मार्गाने त्यावर विजय मिळवला पाहिजे,” असा प्रेरणादायी संदेश रमणिक मुनीजी महाराजसाहेब यांनी दिला. यावेळी उपस्थितांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना त्यांनी अभ्यासपूर्ण उत्तरे दिली.

या कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस चे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी आणि नोईंग गांधी ग्लोबल फ्रेंड्स चे संकेत मुनोत यांनी केले होते. यावेळी ज्येष्ठ नेते उल्हासदादा पवार, पुणे शहर काँग्रेस (पूर्व) चे प्रशांत जगताप, श्रीपाल ललवाणी, निलेश नवलाखा, राजकुमार चोरडिया, संतोष ललवाणी, चेतन अगरवाल, पुष्कर अबनावे, विकास सुपनार, आयूब पठाण, सुरेश कांबळे, अविनाश अडसूळ, ॲड.प्राजक्ता जाधव, संजय वावळे राजू जगताप, आशीष वाघमारे यांच्यासह काँग्रेसचे अनेक प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

अजितदादांचा विकासाचा वारसा आणि अपूर्ण स्वप्नं पूर्ण करण्यासाठी खंबीरपणे उभी आहे – उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार

पुणे जिल्ह्याच्या विकासाला अधिक गती देण्याचा निर्धार; अजितदादांच्या कार्याचा...

केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांची भारतीय जैन संघटनेच्या मुख्यालयास भेट

पुणे, १६: केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी आज...

केंद्र सरकारच्या विविध पदांवर थेट भरती; यूपीएससीकडून ऑनलाइन अर्ज मागवले

जाहिरात क्रमांक १३/२०२६ प्रसिद्ध; पात्र उमेदवारांना ४ डिसेंबरपर्यंत अर्ज...