भारत इतिहास संशोधक मंडळाच्या ऐतिहासिक दस्तऐवजांच्या डिजिटायझेशन प्रकल्पाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते लोकार्पण

Date:

पुणे, दि. १६ : भारत इतिहास संशोधक मंडळाच्या ऐतिहासिक कागदपत्रांच्या डिजिटायझेशन प्रकल्पाचे लोकार्पण केंद्रीय गृहमंत्री व सहकारमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आज येथे करण्यात आले.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मुरकुंबी इतिहास उपक्रमाचे नरेंद्र मुरकुंबी, मंडळाचे अध्यक्ष प्रदीप रावत, सचिव पांडुरंग बलकवडे, कोषाध्यक्ष नंदकुमार निकम, पांडुरंग बलकवडे उपस्थित होते.

भारत इतिहास संशोधक मंडळ गेल्या ११६ वर्षांपासून इतिहास संशोधनाचे महत्त्वपूर्ण कार्य करीत आहे. मंडळाकडे जतन केलेल्या ऐतिहासिक कागदपत्रांच्या माध्यमातून मराठ्यांचा गौरवशाली इतिहास जगासमोर आणण्याच्या उद्देशाने हा डिजिटायझेशन प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या उपस्थितीत २०२१ मध्ये या प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला होता. त्यातील पहिल्या टप्प्याचे लोकार्पण आज करण्यात आले.

या प्रकल्पामुळे www.bismarchives.in या संकेतस्थळावर दुर्मिळ ऐतिहासिक कागदपत्रे तसेच अमूल्य वस्तूंची सचित्र माहिती उपलब्ध होणार आहे. मंडळाकडे सुमारे तीन लाख कागदपत्रे असून, त्यांची सुमारे साडेसहा लाख पृष्ठप्रतिमा (इमेजेस) टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात सुमारे १० हजार ऐतिहासिक कागदपत्रे संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहेत.

यामध्ये बखरी, मुघल फर्माने, हस्तलिखिते, ताम्रपट, चित्रे, नकाशे, शिल्पे, शस्त्रे, शिलालेख, भूमिपत्रे आणि दुर्मिळ ग्रंथांचा समावेश आहे. या माध्यमातून भारतीय इतिहासातील दुर्मिळ आणि महत्त्वपूर्ण माहिती जागतिक स्तरावर अभ्यासक, संशोधक आणि इतिहासप्रेमींसाठी उपलब्ध होणार असल्याचे मंडळाचे अध्यक्ष प्रदीप रावत यांनी सांगितले.

या डिजिटायझेशन प्रकल्पाचे काम चिन्मय भंडारी आणि मिथिलेश कुळकर्णी यांच्या न्यानसा कंपनीने माईंडस्केप हबच्या सहकार्याने पूर्ण केले आहे. प्रकल्पासाठी मुरकुंबी इतिहास उपक्रम आणि भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर यांचेही सहकार्य लाभले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

गांधी-नेहरू यांच्या विचारांमुळेलोकशाही आजही मजबूत-रमणिक मुनीजी महाराजसाहेब

पुणे : महात्मा गांधींनी घडविलेली अहिंसक मने आणि द्वेष...

अजितदादांचा विकासाचा वारसा आणि अपूर्ण स्वप्नं पूर्ण करण्यासाठी खंबीरपणे उभी आहे – उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार

पुणे जिल्ह्याच्या विकासाला अधिक गती देण्याचा निर्धार; अजितदादांच्या कार्याचा...

केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांची भारतीय जैन संघटनेच्या मुख्यालयास भेट

पुणे, १६: केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी आज...

केंद्र सरकारच्या विविध पदांवर थेट भरती; यूपीएससीकडून ऑनलाइन अर्ज मागवले

जाहिरात क्रमांक १३/२०२६ प्रसिद्ध; पात्र उमेदवारांना ४ डिसेंबरपर्यंत अर्ज...