कचरा जाळल्याने भूमिगत वीजवाहिन्या जळाल्या;ताथवडे-पुनावळेतील १६ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित

Date:

पुणे, : वाल्हेकरवाडी येथे महादेव मंदिराजवळील उड्डाणपुलाच्या परिसरात अद्यात व्यक्तीने कचरा जाळण्यात आल्यामुळे आज (दि. २६ ऑक्टोबर) दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास TACO-1 आणि TACO-2 या उच्चदाब भूमिगत विद्युत वाहिन्यांच्या चालू व पर्यायी अशा दोन्ही २२ केव्ही इनकमर केबल जळाल्या. यामुळे २२/११ केव्ही बेंचमार्क उपकेंद्र आणि २२/११ केव्ही पेठकर उपकेंद्रांतून निघणाऱ्या ११ केव्ही उच्चदाब वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा पूर्णपणे खंडित झाला आहे.

या घटनेमुळे पुणे-मुंबई महामार्गाच्या पश्चिमेकडील ताथवडे आणि पुनावळे परिसरातील सुमारे १५ ते १६ हजार वीजग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे.

चालू वीजवाहिनीसोबतच पर्यायी वाहिनीची केबलही जळाल्यामुळे अन्य पर्यायी मार्गाने वीजपुरवठा सुरळीत करण्यावर मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे बाधित वीजवाहिन्यांच्या केबल जोडण्यासह वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी महावितरणच्या तांत्रिक कर्मचाऱ्यांकडून युद्धपातळीवर शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

ताथवडे आणि पुनावळे परिसरातील वीजग्राहकांनी वीजपुरवठा पूर्ववत होईपर्यंत संयम राखून महावितरणला सहकार्य करावे. केबल दुरुस्तीचे काम पूर्ण करून वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत.

वीजवाहिन्यांजवळ कचरा जाळू नका!

उच्चदाब भूमिगत वीजवाहिन्या, वीज केबल्स तसेच वीजयंत्रणेजवळ कचरा जाळल्यामुळे केबल्सचे नुकसान होऊन मोठ्या परिसरातील वीजपुरवठा खंडित होऊ शकतो. अशा घटनांमुळे नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागतो, तसेच महावितरणच्या वीजयंत्रणेचे नुकसान होण्याची शक्यता असते. त्यामुळे नागरिकांनी वीजवाहिन्या, भूमिगत केबल मार्ग आणि विद्युत यंत्रणेजवळ कचरा जाळू नये. कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावून महावितरणच्या वीजयंत्रणेची सुरक्षितता राखण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्राथमिक मतदार यादीचे सर्वंकष ऑडिट करा: धनंजय शिंदे

मतदाराची पात्रता तपासा; दुबार ठराव, सभासदत्वातील विसंगती आणि पूर्वीच्या...

५०० कोटींच्या कथित ऑडिओ क्लिप प्रकरणाच्या चौकशीसाठी SIT स्थापन; आयपीएस शैलेश बलकवडे करणार नेतृत्व!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानंतर मुंबई पोलिसांची कारवाई; मनोज...

‘जंगलं नष्ट करणारे तुम्हीच महाराष्ट्रद्रोही!’; आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्री फडणवीसांवर हल्लाबोल!

कर्जतच्या टोरेंट पॉवर प्रकल्पासाठी ३२ हजारांहून अधिक झाडांच्या तोडीवरून...

‘चित्रपताका मराठी चित्रपट महोत्सव’१५ ते १८ नोव्हेंबर दरम्यान!

-सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्याकडून घोषणा मुंबईतील रवींद्र...