रेल्वे कर्मचाऱ्यांना 78 दिवसांचे वेतन बोनस म्हणून देणार

Date:

नवी दिल्ली,

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने रेल्वे कर्मचाऱ्यांच्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत, 11,40,770 रेल्वे कर्मचाऱ्यांना 2,009,.61 कोटी रुपयांचा 78 दिवसांचा उत्पादकता-आधारित बोनस देण्याला मंजुरी दिली आहे.

पात्र रेल्वे कर्मचाऱ्यांना दरवर्षी दुर्गा पूजा/दसरा सुट्ट्यांपूर्वी हा बोनस दिला जातो. यावर्षीही, सुमारे 11.40 लाख अराजपत्रित रेल्वे कर्मचाऱ्यांना 78 दिवसांच्या वेतनाइतकी बोनसची रक्कम दिली जात आहे. हा बोनस रेल्वेची कामगिरी सुधारण्याच्या दिशेने काम करण्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्याचे काम करतो.

प्रत्येक पात्र रेल्वे कर्मचाऱ्याला 78 दिवसांसाठी मिळणारी कमाल रक्कम 17,951 रुपये इतकी आहे. ही रक्कम ट्रॅक मेंटेनर्स, लोको पायलट्स, ट्रेन मॅनेजर्स गार्ड्स, स्टेशन मास्टर्स, पर्यवेक्षक, तंत्रज्ञ , तंत्रज्ञ मदतनीस , पॉइंट्समन, लिपिकीय कर्मचारी आणि इतर गट-सी  कर्मचारी अशा विविध श्रेणींमधील रेल्वे कर्मचाऱ्यांना दिली जाईल.

2025-26 या वर्षात रेल्वेची कामगिरी अत्यंत चांगली राहिली. रेल्वेने 1,670 दशलक्ष टन मालवाहतुकीचा विक्रम केला आणि सुमारे 7.41 अब्ज प्रवाशांची वाहतूक केली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

जलसंपदा विभागच्या प्रस्तावाला मान्यता नाही मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांना २० टक्के कपातीच्या सूचना

३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत पिण्याच्या पाण्याची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी...

३२ व्या पणे नवरात्रौ महोत्सवात ज्येष्ठ संगीतकार श्रीनिवास खळे आणि यशवंत देव यांना जन्मशताब्दी मानवंदना

पुणे – मराठी भावसंगीताचे विश्व आपल्या अजरामर संगीतरचनांनी समृद्ध...

हिंदू समाजात एकजूट निर्माण झाली पाहिजे-मिलिंद एकबोटे

समस्त हिंदू आघाडीतर्फे राष्ट्रीय एकात्मता दिनपुणे : आजची परिस्थिती...

विद्यार्थ्यांनी भ्रमणध्वनीचा वापर मर्यादित ठेवून अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे- दीपा मुधोळ-मुंडे

पुणे, दि. १५ : समाजकल्याण विभागाच्या स्थापना दिनानिमित्त सहायक...