इफ्फी 2026 साठी माध्यम प्रतिनिधींच्या नोंदणीला 17 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

Date:

नवी दिल्ली, 15 ऑक्टोबर 2026

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने 57 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (IFFI 2026) माध्यम प्रतिनिधींच्या नोंदणीची मुदत दोन दिवसांनी वाढवून ती 17 ऑक्टोबर  2026 केली आहे.

20 ते 28 नोव्हेंबर 2026 या कालावधीत पणजी, गोवा इथे आयोजित होणाऱ्या या महोत्सवाचे वार्तांकन करण्यासाठी इच्छुक असलेले माध्यम प्रतिनिधी पत्र सूचना कार्यालयाच्या (PIB) अधिकृत अधिस्वीकृती पोर्टलद्वारे त्यांचे अर्ज सादर करू शकतात.

पात्र माध्यम प्रतिनिधींनी सुधारित अंतिम मुदतीपूर्वी आपली नोंदणी पूर्ण करावी आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत, असे सुचवण्यात येत आहे.

नोंदणी लिंक: https://accreditation.pib.gov.in/eventregistration/login.aspx

चौकशीसाठी, अर्जदार iffi.mediadesk@pib.gov.in येथे संपर्क साधू शकतात.

इफ्फीबद्दल

1952 मध्ये सुरू झालेला भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात इफ्फी हा दक्षिण आशियातील सर्वांत जुना आणि सर्वांत मोठा चित्रपट सोहळा आहे. केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारितील ‘नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन’ (एनएफडीसी) आणि गोवा राज्य सरकारची ‘एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा’ (ईएसजी) यांच्या वतीने संयुक्तपणे या महोत्सवाचे आयोजन केले जाते. या सोहळ्याच्या निमित्ताने जगभरातील चित्रपटकर्मी, आघाडीचे प्रथितयश कलाकार आणि उदयोन्मुख अभिव्यक्ती एकत्र येत असतात. गोव्याच्या उत्साही  वातावरणाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या महोत्सवात आंतरराष्ट्रीय स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, मास्टरक्लास अर्थात दिग्गजांच्या कार्यशाळा आणि विशेष गौरव सत्रांच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण कथा, भाषा आणि चित्रपट परंपरांचा गौरव केला जातो. 57व्या इफ्फी 2026 संदर्भातील अधिक माहिती आणि अद्ययावत तपशीलांसाठी  https://www.iffigoa.org/  या संकेतस्थळाला भेट द्या.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

जलसंपदा विभागच्या प्रस्तावाला मान्यता नाही मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांना २० टक्के कपातीच्या सूचना

३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत पिण्याच्या पाण्याची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी...

३२ व्या पणे नवरात्रौ महोत्सवात ज्येष्ठ संगीतकार श्रीनिवास खळे आणि यशवंत देव यांना जन्मशताब्दी मानवंदना

पुणे – मराठी भावसंगीताचे विश्व आपल्या अजरामर संगीतरचनांनी समृद्ध...

हिंदू समाजात एकजूट निर्माण झाली पाहिजे-मिलिंद एकबोटे

समस्त हिंदू आघाडीतर्फे राष्ट्रीय एकात्मता दिनपुणे : आजची परिस्थिती...

विद्यार्थ्यांनी भ्रमणध्वनीचा वापर मर्यादित ठेवून अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे- दीपा मुधोळ-मुंडे

पुणे, दि. १५ : समाजकल्याण विभागाच्या स्थापना दिनानिमित्त सहायक...