ठाकरे बंधूंचा एल्गार; कॉक्रोच जनता पार्टीचे मुंबईत आंदोलन:ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात आदित्य ठाकरेंची उद्या पुन्हा आंदोलनाची घोषणा

Date:

मुंबई – एकीकडे दिल्लीत कॉकरोच जनता पार्टी आणि डाव्या संघटनांचे आंदोलन पेटले असताना आता मुंबईतही सरकारविरोधी आंदोलनाचा वणवा पेटला आहे. मुंबईच्या शिवाजी पार्क परिसरात आंदोलनाची शक्यता असल्याने आज सकाळपासून याठिकाणी पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. मात्र, रविवारी दुपारी आदित्य ठाकरे, अमित ठाकरे (Amit Thackeray) आणि तेजस ठाकरे हे तिन्ही ठाकरे आंदोलनात उतरल्याने हे आंदोलन अचानक पेटले. पोलीस काही आंदोलकांना गाडीतून घेऊन शिवसेना भवनाच्या परिसरात जात असताना तिन्ही ठाकरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी अचानक पोलिसांच्या (Mumbai Police) गाडीला घेराव घातला आणि ही गाडी रोखून धरली. गाडीत कोंबलेल्या आंदोलकांना सोडण्यासाठी तिन्ही ठाकरे अडून बसले. आदित्य ठाकरे यांनी तर पोलिसांच्या गाडीवर चढून घोषणा दिल्या. तर अमित ठाकरे आणि तेजस ठाकरे (Tejas Thackeray) हेदेखील समोरच्या गर्दीत ठाण मांडून उभे होते. त्यामुळे या आंदोलनाला अचानक जोर चढला. सीजेपीच्या या आंदोलनात ठाकरेंनी आक्रमक भूमिका घेतल्याने अत्यंत साधे वाटणारे, हे आंदोलन अचानक पेटले. यावेळी आदित्य ठाकरे हे अत्यंत आक्रमक दिसत होते. त्यांनी मोदी सरकार आणि भाजपवर जोरदार टीका केली.

आता हे आंदोलन शांत होणार नाही. आता हे आंदोलन चिघळणार. सगळ्यांनी शिवाजी पार्कच्या दिशेने या. आम्ही आता इथून रात्र झाली तरी हलणार नाही. आम्ही सर्व विभागप्रमुखांना बोलावले आहे. मुंबई पोलीस हे आज दिल्ली पोलिसांसारखे वागले, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले. दरम्यानच्या काळात पोलिसांनी सकाळपासून सीजेपीच्या या आंदोलनात अग्रणी असणारे संदीप देशपांडे आणि मनसेच्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यामुळे अमित ठाकरे हे शिवसेना भवनाजवळून निघून शिवाजी पार्क पोलीस ठाण्याबाहेर जाऊन ठिय्या देऊन बसले आहेत. त्यांच्यापाठोपाठ आदित्य आणि तेजस ठाकरे हेदेखील शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत. त्यामुळे आता तिन्ही ठाकरे शिवाजी पार्कच्या परिसरात ठिय्या देऊन बसल्यास पोलीस यंत्रणेच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. सध्या शिवाजी पार्कच्या परिसरात आंदोलक आणि पोलिसांची मोठी गर्दी आहे. मनसेकडूनही आपल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना शिवाजी पार्कवर येण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे आता शिवाजी पार्कमधील आंदोलन आणखी मोठे होण्याची शक्यता आहे. सकाळपासून पोलिसांनी शिवाजी पार्कमध्ये व्यवस्थित बंदोबस्त लावून आंदोलन होणार नाही, याची काळजी घेतली होती. याठिकाणी मोठ्या पिंजरा गाड्या लावण्यात आल्या होत्या. पोलिसांकडून शिवाजी पार्कमध्ये येणाऱ्या आंदोलकांची धरपकड केली जात होती. काही आंदोलकांना पोलिसांनी फरफटत गाडीपर्यंत नेले. अमित ठाकरे यांना हे दृश्य दिसले तेव्हा त्यांनी त्यावर आक्षेप घेतला. यानंतर तिन्ही ठाकरे बंधूंच्या एन्ट्रीमुळे शिवाजी पार्कमधील हे आंदोलन पेटले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

“लोकशाही संपताना दिसतेय, पण ती संपून देणार नाही”; शिवाजी पार्कवरील कारवाईवर अमित ठाकरे संतापले

मुंबई, ११ ऑक्टोबर : शिवाजी पार्क परिसरात CJPच्या आंदोलनाच्या...

शिवसैनिकांना हात लावाल तर महाराष्ट्र बंद पाडू; आदित्य ठाकरे पोलीस व्हॅनवर चढले, अनिल परबही आक्रमक

मुंबई, ११ ऑक्टोबर : CJPच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दादर-शिवाजी पार्क...

आंदोलकांना बेकायदेशीर ताब्यात घेऊन मारहाण केल्याचा CJPचा आरोप; आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार

नवी दिल्ली, ११ ऑक्टोबर : जंतर-मंतर येथे शांततापूर्ण आंदोलनासाठी...

23 तासांनंतर अभिजीत दीपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांची सुटका; CJP आज पुन्हा जंतर-मंतरकडे

नवी दिल्ली : कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके...