MPSC आंदोलनाच्या आठव्या दिवशी पुन्हा राजकीय आरोप-प्रत्यारोप; विद्यार्थ्यांना हटवण्याच्या सूचनांवरून वातावरण तापले
पुणे : MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा आठवा दिवस सुरू असताना आंदोलनस्थळ रिकामे करण्याच्या पोलिसांच्या सूचनांमुळे वातावरण पुन्हा तापले. सार्वजनिक वाहतुकीला आणि पुणेकरांना अडथळा होत असल्याचा मुद्दा उच्च न्यायालयात मांडण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी आक्रमक भूमिका घेतली. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत त्यांनी याचिकेमागील राजकीय संबंधांबाबत सवाल उपस्थित केला.

