शिवाजीनगरच्या विकासासाठी आ. सिद्धार्थ शिरोळे यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र यांची भेट

Date:

विविध प्रलंबित विकासकामांवर सविस्तर चर्चा
पुणे-छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी ३ ऑक्टोबर रोजी मुंबई येथील ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान मतदारसंघातील अतिशय महत्त्वाच्या प्रलंबित व प्रस्तावित विकासकामांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली असून, याबाबतचे निवेदन मुख्यमंत्र्यांना सुपूर्द करण्यात आले.
या भेटीदरम्यान आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी मुख्यमंत्र्यांकडे आपल्या मागण्या मांडल्या आणि शासनस्तरावरून त्वरित आवश्यक पाठबळ व मंजुरी देण्याची विनंती केली. शिवाजीनगर येथील सर्व पोलीस लाईनचा विकास ‘महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण महामंडळा’च्या माध्यमातून करण्यात यावा. पुणे येथील ऐतिहासिक महात्मा फुले वस्तुसंग्रहालयाचे आधुनिकीकरण करून तेथे नवीन ‘इनोव्हेशन अँड स्टार्टअप हब’ची स्थापना करावी. एम एस आर टी सी आणि महामेट्रो यांच्यात सामंजस्य करार करून शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम व एकत्रित करावी. खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचा पुणे महानगरपालिकेत समावेश करून तेथील नागरिकांना मूलभूत सुविधा मिळवून द्याव्यात. मतदारसंघातील वाकडेवाडी आणि वडारवाडी येथील पुणे महानगरपालिकेच्या पी एम सी कॉलनींचा पुनर्विकास व आधुनिकीकरण करावे. औंध येथील ब्रेमेन चौक येथे होणारी मोठी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी तेथे नवीन उड्डाणपूल किंवा अंडरपासची उभारणी करावी.अशा मागण्यांचा त्यात समावेश होता .
मुख्यमंत्र्यांनी सर्व विषयांची गांभीर्याने दखल घेत मतदारसंघातील या विकासकामांबाबत शासनस्तरावर सकारात्मक निर्णय घेऊन आवश्यक ती तातडीची कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘बाबासाहेबांनी अधिकार दिले; आपण त्यांची किंमत विसरलो’ : अभिजित दिपके

MPSC आंदोलनात सरकारवर हल्लाबोल; ‘धर्म-जात नव्हे, शिक्षण-रोजगाराच्या प्रश्नांवर मतदान...

ब्राह्मण समाजात फसवणूक करण्याची मानसिकता नाही – आशिष दामले

पुणे - ब्राह्मण समाजात फसवणूक करण्याची मानसिकता नसल्याने बॅंकानी...

“अजितदादांचे नाव न वापरता निवडणूक लढवा”; सुनेत्रा पवारांचे बंडखोरांना थेट आव्हान

पुरुषोत्तम जगतापांचे प्रत्युत्तर — “अजितदादा आमच्या हृदयात आहेत; नाव...

युगेंद्र पवारांचा घणाघात; “भाजप मागच्या दराने बारामतीत येण्याचा प्रयत्न करतोय”

‘किटलीशिवाय कपबशी भरत नाही’; सुनेत्रा पवार आणि पुरुषोत्तम जगतापांवर...