ज्ञानेशकुमारांचा राजीनामा हवाच पण मुख्य सुत्रधार रंगा-बिल्ला यांचाही राजीनामा हवा: हर्षवर्धन सपकाळ

Date:

MPSC विरोधात सुरु असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा, MPSC अध्यक्षांचा राजीनामा झालाच पाहिजे.

गांधी जयंतीनिमित्त प्रभारी डॉ. सिरिवेल्ला व प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांची ऐतिहासिक मणीभवनला भेट, गांधी विचार व संविधानाचा विचार पुढे घेऊन जाण्याची आवश्यकता.

मुंबई

निवडणूक व्यवस्था ताब्यात घेऊन भारतीय जनता पक्षाने निष्पक्ष व पारदर्शक निवडणुकांना हरताळ फासला आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार हे भाजपाचे हस्तक म्हणून काम करत आहेत, त्यांचा राजीनामा झालाच पाहिजे पण या षडयंत्राचे मुख्य सुत्रधार रंगा-बिल्ला यांचा राजीनामा होईपर्यंत आंदोलन सुरुच राहिल, असा निर्धार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला आहे.

गांधी जयंती निमित्त ऐतिहासिक मणीभवनला प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत AICC सचिव B.M. संदीप, रेहाना चिस्ती, माजी मंत्री अनिस अहमद, प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते माजी आ. धीरज देशमुख प्रदेश सरचिटणीस ऍड. संदेश कोंडविलकर, जोजो थॉमस, ब्रिज दत्त, मोनिका जगताप उपस्थित होते.

यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी मणिभवन येथे दिर्घकाळ वास्तव्य केले, या वास्तूत अनेक ऐतिहासिक निर्णय झाले आहेत. CWC च्या बैठकाही याच मणिभवन मध्ये झाल्या आहेत. फक्त जयंती व पुण्यतिथीलाच गांधींचे स्मरण करुन चालणार नाही तर गांधी विचार, संविधानाचा विचार पुढे घेऊन जाण्याची आज नितांत गरज आहे. गांधी विचार हाच शिव, शाहू, फुले, आंबेडकर, संत परंपरेचा विचार आहे. गाडगे महाराज, तुकडोजी महाराज, कबीर यांचा विचार आहे. हा विचार एकाबाजूला आहे तर दुसऱ्या बाजूला स्पृश्य-अस्पृशता मानणारा, भेदाभेद मानणारा रा. स्व. संघाचा विचार आहे. मागील वर्षी दसऱ्याला २ ऑक्टोबर रोजी रा. स्व. संघाला १०० वर्षे पूर्ण झाली, त्यांची शंभरी भरलेली आहे, त्यांना गांधी समोर नतमस्तक व्हावे लागले, म्हणून आमची त्यांना सल्ला वजा विनंती आहे की, संघ बरखास्त करावा व त्यांच्या कार्यालयात भारताचे संविधान लावावे, असे सकपाळ म्हणाले..
पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, निवडणूक आयोगाने फॉर्म ६ मध्ये जे मनमानी बदल केले होते, ते मागे घ्यावे लागले आहेत. यासंदर्भात लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी उपस्थित केलेला प्रश्न बरोबर असून निवडणूक निर्णय अधिकारी यांचे अधिकार खाजगी कंपनीला देण्याचा निर्णय कोणी घेतला होता, याचा खुलासा झाला पाहिजे.
MPSC अध्यक्षांचा राजीनामा झालाच पाहिजे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा कारभार अत्यंत ढिसाळ पद्धतीचा असून विद्यार्थ्यांनी अनेकवेळा आंदोलने करूनही त्यात सुधारणा होत नाही. सध्या विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरु आहे, त्याला काँग्रेस पक्षाचा पाठिंबा आहे. काँग्रेस पक्ष नेहमीच विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असून एमपीएससी अध्यक्षांचा राजीनामा झालाच पाहिजे या विद्यार्थ्यांची मागणीही रास्तच आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी म्हटले आहे.

डॉ. मनमोहनसिंहांना जे जमले ते मोदींना का जमत नाही?

महागाईवर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, भाजपा सरकारमध्ये सर्वसामान्य जनतेला महागाईच्या झळा बसत आहेत पण मोदी सरकारकडे महागाईवर नियंत्रण मिळवण्याचे कोणतेही धोरण नाही. डॉ. मनमोहनसिंह सरकार असतानाही पेट्रोल, डिझेल, व गॅस सिलिंडरचे दर वाढले असता सरकारने त्याची झळ जनतेला बसू दिली नाही. पेट्रोल ७० रुपये लिटर तर सिलिंडर ४५० रुपयांना मिळत होते पण मोदी सरकार फक्त मोजक्या उद्योगपतींसाठी काम करते, त्यांना सर्वसामान्य जनतेचे प्रश्न, समस्या दिसत नाहीत, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘बाबासाहेबांनी अधिकार दिले; आपण त्यांची किंमत विसरलो’ : अभिजित दिपके

MPSC आंदोलनात सरकारवर हल्लाबोल; ‘धर्म-जात नव्हे, शिक्षण-रोजगाराच्या प्रश्नांवर मतदान...

ब्राह्मण समाजात फसवणूक करण्याची मानसिकता नाही – आशिष दामले

पुणे - ब्राह्मण समाजात फसवणूक करण्याची मानसिकता नसल्याने बॅंकानी...

“अजितदादांचे नाव न वापरता निवडणूक लढवा”; सुनेत्रा पवारांचे बंडखोरांना थेट आव्हान

पुरुषोत्तम जगतापांचे प्रत्युत्तर — “अजितदादा आमच्या हृदयात आहेत; नाव...

युगेंद्र पवारांचा घणाघात; “भाजप मागच्या दराने बारामतीत येण्याचा प्रयत्न करतोय”

‘किटलीशिवाय कपबशी भरत नाही’; सुनेत्रा पवार आणि पुरुषोत्तम जगतापांवर...