भाजपची विधानपरिषद उमेदवारांची यादी जाहीर; पुण्यात धक्कातंत्र

Date:

पुणे पदवीधरमधून डॉ. स्मिता जाधव, पुणे शिक्षक मतदारसंघातून कौस्तुभ गावडे; नागपूर पदवीधरमधून सुधाकर कोहळे रिंगणात

पुणे : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीसाठी राजकीय हालचालींना वेग आला असताना भारतीय जनता पक्षाने आपल्या वाट्याला आलेल्या तीन जागांसाठी उमेदवारांची अधिकृत घोषणा केली आहे. पुणे पदवीधर मतदारसंघातून डॉ. स्मिता योगेश जाधव, पुणे शिक्षक मतदारसंघातून कौस्तुभ गावडे, तर नागपूर पदवीधर मतदारसंघातून सुधाकर कोहळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

पुणे पदवीधर मतदारसंघात भाजपने धक्कातंत्र अवलंबल्याची चर्चा आहे. या मतदारसंघातून शरद लाड यांचे नाव दीर्घकाळ चर्चेत होते आणि त्यांनीही निवडणुकीची तयारी सुरू ठेवली होती. मात्र अंतिम क्षणी पक्षाने डॉ. स्मिता जाधव यांच्यावर विश्वास दाखवला. डॉ. जाधव या शिक्षण क्षेत्राशी संबंधित असून पुणे विभागातील पदवीधर मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार म्हणून आता रिंगणात उतरणार आहेत.

भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने या तिन्ही उमेदवारांच्या नावांना मंजुरी दिल्यानंतर 4 ऑक्टोबर रोजी उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. विधानपरिषदेच्या संबंधित पाच जागांसाठी 23 ऑक्टोबर रोजी मतदान होणार असून 27 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 6 ऑक्टोबर, छाननी 7 ऑक्टोबर आणि अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 9 ऑक्टोबर आहे.

पुण्यात दोन्ही उमेदवार कोल्हापूरकडचे

पुणे पदवीधर आणि पुणे शिक्षक या दोन्ही मतदारसंघांसाठी भाजपने कोल्हापूरशी संबंधित उमेदवारांना संधी दिल्याने पक्षाच्या स्थानिक राजकारणातही चर्चा सुरू झाली आहे. पुणे, सातारा, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांतील इच्छुकांकडूनही या मतदारसंघांसाठी दावे होते. त्यामुळे भाजपच्या या ‘कोल्हापूर कार्ड’कडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

पुणे शिक्षक मतदारसंघातून कौस्तुभ गावडे

पुणे शिक्षक मतदारसंघातून भाजपने कौस्तुभ गावडे यांना उमेदवारी दिली आहे. गावडे हे शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित असून त्यांच्या नावासाठी भाजपमधील वरिष्ठ नेत्यांचा आग्रह असल्याची चर्चा आधीपासून सुरू होती.

ही जागा भाजपच्या वाट्याला गेल्यामुळे मात्र महायुतीतील अंतर्गत राजकारण अधिक चुरशीचे झाले आहे. एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय मंगेश चिवटे यांनीही पुणे शिक्षक मतदारसंघातून अर्ज भरण्याचा निर्णय घेतल्याने या जागेवरील महायुतीतील समीकरणांकडे विशेष लक्ष लागले आहे.

नागपूर पदवीधरमध्ये सुधाकर कोहळेंना संधी

भाजपचा पारंपरिक प्रभाव असलेल्या नागपूर पदवीधर मतदारसंघातून माजी आमदार सुधाकर कोहळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या मतदारसंघासाठी माजी आमदार अनिल सोले यांच्या नावाचीही चर्चा होती. मात्र पक्षाने कोहळे यांच्यावर शिक्कामोर्तब केले.

कोहळे यांच्या उमेदवारीनंतर अनिल सोले यांनीही निवडणूक लढवण्याचे संकेत दिल्याने नागपुरातही पक्षांतर्गत बंडखोरीचे सावट निर्माण झाले आहे.

भाजपचे तीन उमेदवार

  • पुणे पदवीधर मतदारसंघ — डॉ. स्मिता योगेश जाधव
  • पुणे शिक्षक मतदारसंघ — कौस्तुभ गावडे
  • नागपूर पदवीधर मतदारसंघ — सुधाकर कोहळे

महायुतीच्या जागावाटपानुसार भाजप तीन जागा लढवत असून उर्वरित दोन जागांपैकी अमरावती शिक्षक मतदारसंघ शिवसेना आणि छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला जाणार आहे. त्यामुळे आता उमेदवारी अर्जांची अंतिम मुदत आणि संभाव्य बंडखोरीनंतरच या निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘बाबासाहेबांनी अधिकार दिले; आपण त्यांची किंमत विसरलो’ : अभिजित दिपके

MPSC आंदोलनात सरकारवर हल्लाबोल; ‘धर्म-जात नव्हे, शिक्षण-रोजगाराच्या प्रश्नांवर मतदान...

ब्राह्मण समाजात फसवणूक करण्याची मानसिकता नाही – आशिष दामले

पुणे - ब्राह्मण समाजात फसवणूक करण्याची मानसिकता नसल्याने बॅंकानी...

“अजितदादांचे नाव न वापरता निवडणूक लढवा”; सुनेत्रा पवारांचे बंडखोरांना थेट आव्हान

पुरुषोत्तम जगतापांचे प्रत्युत्तर — “अजितदादा आमच्या हृदयात आहेत; नाव...

युगेंद्र पवारांचा घणाघात; “भाजप मागच्या दराने बारामतीत येण्याचा प्रयत्न करतोय”

‘किटलीशिवाय कपबशी भरत नाही’; सुनेत्रा पवार आणि पुरुषोत्तम जगतापांवर...