दिवेआगर समुद्रकिनारी भीषण दुर्घटना; आळंदीतील आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

Date:

विनर्स अकॅडमीची सहल; ४२ विद्यार्थी आणि दोन शिक्षकांसह ४४ जण गेले होते दिवेआगरला

रायगड : कोकणातील प्रसिद्ध दिवेआगर समुद्रकिनारी गुरुवारी मोठी दुर्घटना घडली. पुणे जिल्ह्यातील आळंदी येथून सहलीसाठी आलेल्या आठ विद्यार्थ्यांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला. सर्व आठही मृतदेह बाहेर काढण्यात आले असून या घटनेने दिवेआगरसह आळंदी परिसरात शोककळा पसरली आहे. आठ विद्यार्थ्यांच्या मृत्यूची माहिती पोलिसांकडूनही समोर आली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, आळंदी येथील विनर्स अकॅडमी या खासगी शिकवणी वर्गातील विद्यार्थी सहलीसाठी दिवेआगर येथे आले होते. एकूण ४२ विद्यार्थी आणि दोन शिक्षक असे ४४ जण या सहलीत सहभागी झाले होते. मृत विद्यार्थी अकरावीचे शिक्षण घेत होते.

या दुर्दैवी घटनेत यश किरण वानखेडे, सोहम तुकाराम भांडवलकर, तन्मय दत्तात्रय वहिले, कौस्तुभ संदीप दौंड, कैवल्य वासनकर, राजवीर वहिले, प्रणव बनसोडे आणि सुमित अहिरे या आठ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे.

समुद्रकिनारी पोहण्याचा आनंद घेत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने आठ विद्यार्थी खोल पाण्यात ओढले गेल्याची प्राथमिक माहिती आहे. घटना लक्षात येताच स्थानिक नागरिक आणि महाकाली वॉटर स्पोर्ट्सच्या कर्मचाऱ्यांनी मदतकार्य सुरू केले. त्यानंतर सर्व आठ जणांचे मृतदेह समुद्रातून बाहेर काढण्यात आले.

मृतदेह बोर्ली पंचतन प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले आहेत. पोलीस आणि स्थानिक प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून दुर्घटना नेमकी कशी घडली, विद्यार्थ्यांना समुद्रात जाण्याबाबत कोणत्या सूचना देण्यात आल्या होत्या आणि सुरक्षाव्यवस्था काय होती, याचा पुढील तपास सुरू आहे.

घटनेची माहिती मिळताच राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी रायगड जिल्हाधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून परिस्थितीची माहिती घेतल्याचे सांगण्यात आले आहे. बचावकार्य, मदतकार्य आणि प्रशासनामार्फत आवश्यक कार्यवाही तातडीने करण्याच्या सूचना त्यांनी दिल्याचेही नमूद करण्यात आले आहे. मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांप्रती त्यांनी दुःख व्यक्त केले.

मंत्री भरत गोगावले आणि आदिती तटकरे यांनीही प्रशासनाशी संपर्क साधल्याची माहिती आहे. दुर्घटनेनंतर समुद्रकिनारी मदत आणि प्रशासकीय हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत.

दिवेआगर हे रायगड जिल्ह्यातील लोकप्रिय पर्यटनस्थळ असून राज्याच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने पर्यटक येथे येतात. मात्र समुद्रातील भरती-ओहोटी, अचानक वाढणारी खोली आणि पाण्याचा वेग यामुळे समुद्रात उतरताना योग्य सुरक्षेची खबरदारी घेण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

खडकी रेल्वे स्थानकाजवळ भुयारी मार्ग उभारण्याची उपमहापौर परशुराम वाडेकर यांची मागणी

पुणे : खडकी रेल्वे स्थानक परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या...

“गुन्हेगारांना फासावर लटकवल्याशिवाय शांत बसणार नाही” — उद्धव ठाकरे

प्रदीप ऊर्फ बाळू पूर्णेकर यांच्या कुटुंबीयांची ठाण्यात सांत्वनपर भेट;...

“ज्ञानेश कुमार ‘देशाचे गद्दार’; त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करा” — अभिजीत दिपके

२ ऑक्टोबरपासून देशव्यापी आंदोलनाची घोषणा; “तीन महिने तुरुंगात टाकले...