व्यापक स्वरुपात मतदार जनजागृती करा- विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले

Date:

महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर आणि पुणे विभाग शिक्षक मतदार संघाची निवडणूक

पुणे, दि. 29 : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर मतदार संघ आणि पुणे विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी २३ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. एकही पात्र मतदार मतदानापासून वंचित राहणार नाही आणि सर्व मतदारांना मतदानाचा हक्क नियमानुसार बजावता यावा, याकरिता विविध माध्यमांद्वारे व्यापक स्वरुपात मतदार जनजागृती करण्यात यावी, असे निर्देश निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांनी दिले.

विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित समन्वय अधिकाऱ्यांच्या बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी अतिरिक्त आयुक्त तुषार ठोंबरे यांच्यासह समन्वय अधिकारी आणि दूरदृष्यप्रणालीद्वारे निवडणुकीशी संबंधित पाचही जिल्ह्यातील अधिकारी उपस्थित होते.

श्रीमती तेली-उगले म्हणाल्या, मतदारांना मतदान करतांना वापरावयाचे पेन, पसंतीक्रमानुसार मतदान करण्याच्या पद्धतीबाबत माहिती देण्यात यावी. सर्व समन्वय अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील समन्वय अधिकाऱ्यांशी संपर्कांत राहून निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पडेल, याबाबत दक्षता घ्यावी. मनुष्यबळाचे योग्य व्यवस्थापन आणि मतदान व मतमोजणीसाठी आवश्यक साहित्याची पूर्तता होईल, याकडे विशेष लक्ष देण्यात यावे. मतदान व मतमोजणी प्रक्रियेशी सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणाचे आयोजन करावे, असेही त्यांनी सांगितले.

निवडणूक विषयक कामकाज करतांना आचारसंहिता विषयक तरतुदींबाबत मार्गदर्शक पुस्तिका तसेच जिल्हा निवडणूक प्रशासन तसेच भारत निवडणूक आयोगाच्या आणि राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या संकेतस्थळावरील सूचनांप्रमाणे कार्यवाही करावी, असेही विभागीय आयुक्त म्हणाल्या.

यावेळी नामनिर्देशन पत्र दाखल प्रक्रिया, मतदान व मतमोजणी प्रकिया, मतदार जनजागृती, मनुष्यबळ नियोजन, आचारसंहिता, तक्रारी, माध्यमे व खर्च नियंत्रण, मतदान पूर्वतयारी, वाहतूक आराखडा आदी विविध बाबींचा आढावा घेण्यात आला.
0000

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सेवा संकल्प अभियान २०२६ अंतर्गत भित्तीपत्रक व पोस्टर निर्मिती स्पर्धा उत्साहात

पुणे, दि. २९: आंबेगाव तालुक्यातील आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृह,...

पुणे विभाग शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ निवडणूकीची सुचना मंगळवारी प्रसिद्ध

पुणे, दि.२९ : महाराष्ट्र विधान परिषदेसाठी पुणे विभाग शिक्षक...

कात्रज-कोंढवा रस्ता ८४ मीटर करण्यासाठी मार्च २०२८ ची डेडलाईन; आयुक्त नवल किशोर राम यांनी केली कामांची पाहणी

पुणे : कात्रज-कोंढवा रस्ता तसेच कात्रज चौकातील उड्डाणपुलाच्या कामाला...