पुणे: शहर जिल्हा काँग्रेस कमिटी पश्चिम विभागाच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र आज राज्याचे माजी राज्य मंत्री आ. डॉ. विश्वजीत कदम यांच्या हस्ते काँग्रेस भवन येथे झालेल्या कार्यक्रमात समारंभपूर्वक देण्यात आले. तसेच यावेळी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वेबसाईटचे (punecongress.in) (deeptichawadhray.in) उद्घाटनही यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी पश्चिम विभागाच्या अध्यक्षा दीप्ती चवधरी, पूर्व विभागाचे अध्यक्ष प्रशांत जगताप, महाराष्ट्राचे माजी गृहराज्य मंत्री रमेश बागवे, माजी आमदार उल्हास पवार, पुणे मनपा गटनेते चंदूशेठ कदम, प्रदेश पदाधिकारी अमिर शेख, हनुमंत पवार, भाऊसाहेब आजबे, महिला अध्यक्षा स्वाती शिंदे आदी उपस्थित होते.
याप्रसंगी मा. आ. डॉ. विश्वजीत कदम म्हणाले की, ‘‘देशात विविध प्रश्नांबाबत विद्यार्थी आणि युवकांची आंदोलने केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर साऱ्या देशात चालू आहेत. केंद्रातील मोदी सरकारचा अनागोंदी आणि अकार्यक्षक कारभार, असह्य झालेली महागाई, शिक्षण व्यवस्थेचा उडालेला बोजबारा आणि नोकरी व रोजगाराविना विना फिरणारे युवकांचे तांडे हे साऱ्या देशाची विदारक परिस्थिती आहे. मात्र देशातील जेंझी आणि तरूण आता पेटून उठला असून पुण्यात झालेल्या काँग्रेस नेते खा. राहुलजी गांधींच्या ‘छात्रों की गुंज’ कार्यक्रमामुळे देशातील युवक – युवतींना दिशा व उमेद मिळाली आहे. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी देखील आपापल्या भागात युवा शक्तीला अधिक संघटित करण्यावर भर दिला पाहिजे आणि काँग्रेसचा कार्यकर्ता हा जनतेच्या हितासाठी रस्त्यावर दिसला पाहिजे.’’
यानंतर पुणे शहर काँग्रेस कमिटी पश्चिम विभागाच्या अध्यक्षा दिप्ती चवधरी म्हणाल्या की, ‘‘मला अध्यक्ष होवून १०० दिवस झाले असून या १०० दिवसांचा कार्यअहवाल मी खा. राहुलजी गांधी यांना नाशिक येथे झालेल्या शिबीरामध्ये दिला आहे.
पुण्यातील काँगेस पक्ष हा परिवर्तनाचे चक्र कायम राखत आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा खासदार व आमदार असेल तसेच पुणे महानगरपालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवेल तील अशी खात्री देते. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी पक्ष संघटना वाढीसाठी प्रयत्न करून पक्षाला बळगटी द्यावी.’’
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नगरसेवक सुनिल शिंदे यांनी केले तर आभार राजेंद्र भुतडा यांनी मानले.

