सुनावणी प्रक्रियेत दस्तऐवजीकरणाला प्राधान्य द्या : शीतल तेली- उगले

Date:

मतदार यादी निरीक्षक तथा विभागीय आयुक्त शीतल तेली- उगले यांच्याकडून पुणे जिल्ह्यातील कामाचा आढावा

पुणे, : पुणे जिल्ह्यातील मतदारसंख्या राज्यात सर्वाधिक असून, विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत पहिल्या टप्प्यातील काम चांगल्या पद्धतीने पूर्ण करण्यात आले आहे. आता दुसऱ्या टप्प्यात प्राप्त होणाऱ्या दावे व हरकतींवर सुनावणी प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. ही प्रक्रिया पारदर्शकपणे आणि प्रभावीपणे राबविताना दस्तऐवजीकरणाला प्राधान्य द्यावे, अशा सूचना मतदार यादी निरीक्षक तथा विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत दुसऱ्या टप्प्यातील दावे व हरकतींवरील सुनावणी प्रक्रियेच्या अनुषंगाने मतदार नोंदणी अधिकारी व सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कामाचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या. बैठकीस अपर जिल्हाधिकारी सतीश राऊत, रोहयो सहआयुक्त तथा नोडल अधिकारी संजीव पलांडे, अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी विक्रांत बगाडे , उपजिल्हाधिकारी मीनल कळसकर आदी उपस्थित होते.

श्रीमती तेली-उगले म्हणाल्या, प्राप्त दावे व हरकतींवर सुनावणी घेण्यासाठी योग्य नियोजन करून वेळापत्रक निश्चित करावे आणि त्याचे काटेकोरपणे पालन करावे. मतदार यादीतील विसंगती शोधण्याचे काम सुरू करावे. नोटीस बजावताना ती संबंधित मतदारापर्यंत पोहोचेल, याची दक्षता घ्यावी. एकही पात्र मतदार मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहणार नाही, तसेच भारतीय नसलेला अपात्र मतदार यादीत समाविष्ट होणार नाही यासाठी बारकाईने नियोजन करावे.

सुनावणीदरम्यान मतदारांना नम्रपणे आणि योग्य मार्गदर्शन करावे. सुनावणीशी संबंधित सर्व तपशील सुरक्षितपणे जतन करावेत. कोणत्याही आमिषाला बळी न पडता निःपक्षपातीपणे काम पूर्ण होईल, याची सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काळजी घ्यावी. मृत व्यक्तीच्या बाबतीत आवश्यक पुरावे प्राप्त झाल्याशिवाय मतदार यादीतून नाव वगळू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.

जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघनिहाय महत्त्वाच्या व्यक्तींची नावे प्रारूप मतदार यादीत समाविष्ट असल्याची खात्री करावी. स्वीप उपक्रमांवर विशेष भर देऊन नवीन मतदारांच्या नोंदणीसाठी प्रयत्न करावेत. लोकप्रतिनिधींशी नियमित संवाद ठेवावा. काम करताना येणाऱ्या अडचणी व शंकांबाबत परस्पर चर्चा करून त्यांचे निरसन करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

यावेळी उपजिल्हाधिकारी मीनल कळसकर यांनी जिल्ह्यातील विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत प्रारूप मतदार यादी, एएसडीडी यादी तसेच नियुक्त मनुष्यबळाबाबत सादरीकरणाद्वारे माहिती दिली.

बैठकीस जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांचे मतदार नोंदणी अधिकारी व सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

गणेशोत्सव काळात पुणे शहरातील मध्यवर्ती भागात जड-अवजड वाहनांना वाहतुकीस बंदी

पुणे : गणेशोत्सव काळात पुणे शहरातील मध्यवर्ती भागात नागरिकांची...

पुण्याच्या सर्वांगीण विकासासाठी पीएमआरडीएचा ‘मास्टर प्लॅन’ गतिमान करा

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार इनर रिंग रोड, मेट्रो लाईन-३,...

‘माझा पर्यावरणपूरक गणपती, माझी जबाबदारी’ उपक्रमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश

विश्व हिंदू जागृती फाउंडेशन च्या वतीने पर्यावरण पूरक गणेशोत्सव...