‘एआय’ मोड्यूलने महावितरणचा वीजचोरांवर सर्जिकल स्ट्राईक; ३ महिन्यांत २८ हजार वीजचोऱ्यांचा पर्दाफाश

Date:

मुंबई, दि. १० सप्टेंबर २०२६: वीजचोरीविरोधी तडाखा देण्याच्या मोहिमेमध्ये महावितरणने आता ‘एआय’च्या ‘सुपर इंटेलिजन्स’चा वापर करून वीजचोरांवर सर्जिकल स्ट्राईक सुरु केला आहे. तब्बल १९० भरारी पथकांकडून वीजजोडण्यांची तपासणी आणि ‘एआय’ मोड्यूलच्या सूक्ष्म विश्लेषणातून गेल्या तीन महिन्यात ६६ कोटी २८ लाख रुपयांच्या २७ हजार ९६४ वीजचोऱ्यांचा पर्दाफाश झाला आहे. आतापर्यंत वीजचोरी व तडजोड शुल्काची रक्कम न भरलेल्या २८९ प्रकरणांमध्ये फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

वीजचोरीविरोधी पारंपरिक तपासणीसोबतच महावितरणने आता हायटेक मोहीम उघडली आहे. यासाठी थेट ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ व ‘मशीन लर्निंग’चा वापर करून वीजचोरीचे अचूक भाकित करणारे मोड्यूल तयार केले आहे. वीजग्राहकांचा किंवा परिसरातील वीज वापराचा जुना आलेख, अचानक घटलेली किंवा वाढलेली मागणी, मीटरमधील तांत्रिक फेरफार आणि इतर ५० हून अधिक तांत्रिक निकषांचे हे मोड्यूल २४ तास सूक्ष्म विश्लेषण करत आहे. ज्या ग्राहकांच्या वीजवापरामध्ये शंकास्पद फरक आढळत आहे त्या ग्राहकांना हे ‘एआय’चे मोड्यूल ‘हाय-रिस्क’ श्रेणीत टाकत आहे. त्यामुळे कोणत्याही तपासणीशिवाय थेट चोरी होणाऱ्या ठिकाणाची अचूक माहिती या मोड्यूलद्वारे उपलब्ध होत आहे.

‘एआय’च्या ‘सुपर इंटेलिजन्स’चा वापर करून वीजचोरीच्या ठिकाणांची तपासणी करण्यासाठी महावितरणचे राज्यभरात १९० हून अधिक विशेष भरारी पथके कार्यरत आहेत. वीजचोरीविरोधी धडक कारवाईत कुठेही हयगय होऊ नये यासाठी वीजजोडण्यांच्या तपासणीपासून ते वीजबिलांच्या आकारणीपर्यंत संपूर्ण प्रक्रिया ‘थेफ्ट ट्रॅकिंग अॅण्ड मॉनिटरिंग सिस्टीम’द्वारे पूर्णपणे ऑनलाइन करण्यात आली आहे. यासाठी एक स्वतंत्र मोबाईल अ‍ॅप विकसित करण्यात आले आहे. वीजचोरीचे ठिकाण ते तपासणीचे लाईव्ह फोटो, डिजिटल पंचनामा, जागेवरच वीजपुरवठा खंडित करणे आणि दंडात्मक बिलांची वसूली करेपर्यंतची सर्व माहिती या अ‍ॅपमध्ये रिअल-टाईम अपडेट केली जात आहे. त्यामुळे कारवाईत अत्यंत पारदर्शकता आणि वेग आला आहे.

गेल्या जून ते ऑगस्ट या तीन महिन्यांत महावितरणअंतर्गत संवसु विभाग आणि सुरक्षा व अंमलबजावणी विभागाच्या नियमित व विशेष पथकांनी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक विभागात ५ हजार ८३, कोकण- ११ हजार ८३, नागपूर- ५ हजार ९४९ आणि पुणे प्रादेशिक विभागात ५ हजार ८४९ अशा एकूण २७ हजार ९६४ वीजचोऱ्या उघड केल्या आहेत. त्यातील २४ हजार ५०८ वीजचोऱ्यांच्या मूल्यांकनातून ६६ कोटी २८ लाख रुपयांची वीजचोरी केल्याचे स्पष्ट झाले आहे व संबंधितांना त्याचे वीजबिल देण्यात आले आहे. आतापर्यंत वीजचोरीच्या बिलांपोटी १० हजार ८१० प्रकरणांत २९ कोटी ८५ लाख रुपयांचा भरणा करण्यात आला आहे. वीजचोरीच्या संपूर्ण रकमेचा तडजोड शुल्कासह मुदतीत भरणा केला नाही तर संबंधित वीजचोरांविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात येत आहे. आतापर्यंत २८९ प्रकरणांत कलम १३५ नुसार फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहे. वीजचोरीच्या गुन्ह्यासाठी तीन वर्षांपर्यंत तुरुंगवासाच्या व दंडाच्या शिक्षेची तरतूद आहे.

श्री. लोकेश चंद्र (मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव आणि अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, महावितरण) – ‘येत्या तीन वर्षांत महावितरणची तांत्रिक व वाणिज्यिक हानी १० टक्क्यांपेक्षा कमी करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी वीजबिलांच्या थकबाकी वसूलीला प्राधान्य देत विजचोरीविरुद्ध धडक मोहीम सुरु करण्यात आली आहे. वीजचोरीचे प्रकार उघड करण्यासाठी ‘एआय’ मॉड्यूल विकसित करण्यात आले असून त्याद्वारे वीजचोरीविरुद्धची धडक कारवाई आणखी तीव्र व अचूक करण्यात आली आहे.’

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ट्रम्प म्हणाले- मध्यावधी निवडणुका जिंकल्यास प्रत्येक प्रौढाला 5000 डॉलर देतील

पुणे - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी सांगितले...

अतिरेकी धमक्यांना न जुमानता काश्मीरमध्ये साजरा होणार गणेशोत्सव

काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना पुण्यातील मानाच्या गणपतींच्या मूर्ती प्रदान ⁠सलग...

पदाधिकारी-नगरसेवकांमध्ये समन्वय वाढवणार; सर्वांच्या प्रश्नांवर तोडगा काढू : मुरलीधर मोहोळ

१२६ नगरसेवकांशी संवादानंतर मोहोळ माध्यमांसमोर; महापौर, सभागृह नेते आणि...

आशाजींची गाणी कित्येक पिढ्यांना आनंद देत राहतील– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

• आशा भोसले यांच्या ९३ व्या जन्मदिनानिमित्त संगीतकार ए....