मध्यस्थी प्रक्रियेत पक्षकारांचे म्हणणे समजून घेणे आणि संवाद महत्त्वाचा— प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजू ए. एस. शेंडे

Date:

पुणे : न्यायप्रक्रियेकडे केवळ विजय किंवा पराभवाच्या दृष्टिकोनातून न पाहता पक्षकारांचे म्हणणे समजून घेणे, त्यांच्या भावना जाणून घेणे आणि संवादाच्या माध्यमातून मतभेद दूर करण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. मध्यस्थी प्रक्रियेत संवाद, समजूतदारपणा आणि प्रेमळपणाला विशेष महत्त्व आहे, असे प्रतिपादन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती अंजू ए. एस. शेंडे यांनी केले.

शिवाजीनगर जिल्हा न्यायालयातील अशोका हॉल येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, पुणे आणि पुणे बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मध्यस्थी जनजागृती कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

कार्यक्रमास सेवानिवृत्त प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. शिरीषकुमार हाडे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव श्रीमती रेवती आर. देशपांडे तसेच पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. काळूराम बबन भुजबळ उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना श्रीमती शेंडे म्हणाल्या की, मध्यस्थी प्रक्रियेत पक्षकारांचे म्हणणे आणि त्यांच्या भावनांचा विचार करून संवादातून तोडगा काढण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. मध्यस्थी प्रक्रियेसाठी संभाषण चातुर्य आवश्यक असून संतुलन राखणे गरजेचे आहे. मध्यस्थाने स्वतःची निर्णायक भूमिका घेऊ नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सेवानिवृत्त प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. शिरीषकुमार हाडे यांनी मध्यस्थी प्रक्रियेची कार्यपद्धती, मध्यस्थाची भूमिका आणि मध्यस्थी प्रक्रियेचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव श्रीमती रेवती आर. देशपांडे यांनी मध्यस्थी प्रक्रिया राबविताना येणाऱ्या विविध अडचणी तसेच त्या दूर करण्यासाठी आवश्यक बाबींबाबत मार्गदर्शन केले. तसेच १२ सप्टेंबर २०२६ रोजी आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये सर्वांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन सहकार्य करावे, असे आवाहन केले.

पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. काळूराम बबन भुजबळ यांनीही सर्व वकिलांनी मध्यस्थी प्रक्रियेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवून पक्षकारांना त्वरित व समाधानकारक न्याय मिळवून देण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन केले.
0000

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महिलांसाठीचा निधी दृश्यमान, पुरेसा आणि त्याचा मागोवा घेता येणारा असला पाहिजे : डॉ. नीलम गोऱ्हे

राष्ट्रीय महिला आयोगाच्या महिला लोकप्रतिनिधी क्षमता-विकास परिषदेत ‘जेंडर रिस्पॉन्सिव्ह...

पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरात आणि महाराष्ट्राच्या दौऱ्यावर

पंतप्रधानांच्या हस्ते वडोदरा इथल्या 35,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या...

जनगणना २०२७ साठी ४० बाबींवर माहिती संकलित करण्याचे केंद्र शासनाचे निर्देश

पुणे, : भारताची जनगणना २०२७ च्या अनुषंगाने विहित कुटुंब...