भरती परीक्षा पद्धतीच्या सर्वंकष अभ्यासासाठी पुण्यात १२ सप्टेंबरला सल्लामसलत

Date:

विद्यार्थी, उमेदवार, शैक्षणिक संस्था, परीक्षा यंत्रणा, विषयतज्ञांना सहभागी होण्याचे आवाहन

पुणे, : राज्यातील भरती परीक्षा पद्धतीच्या विविध बाबींचा सर्वंकष अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने उच्चस्तरीय समिती गठित केली आहे. या समितीच्या माध्यमातून विद्यार्थी, उमेदवार, शैक्षणिक संस्था, परीक्षा यंत्रणा, विषयतज्ज्ञ तसेच संबंधित घटकांशी संवाद साधून त्यांच्या सूचना, मते व अनुभव जाणून घेण्यात येणार आहेत.

या अनुषंगाने समितीची पुणे विभागीय सल्लामसलत १२ सप्टेंबर २०२६ रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे आयोजित करण्यात आली आहे. ही सल्लामसलत सकाळी १०.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत होणार आहे. या चर्चेत विद्यार्थी व स्पर्धा परीक्षा उमेदवार, शैक्षणिक संस्था, परीक्षा प्रक्रियेशी संबंधित यंत्रणा, विषयतज्ज्ञ आणि अन्य संबंधित घटक सहभागी होऊ शकतील.

भरती परीक्षा प्रक्रियेतील विविध टप्प्यांबाबतचे अनुभव, अपेक्षा आणि सुधारणा सूचना जाणून घेणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. पुणे महसूल विभागातील सल्लामसलत प्रक्रियेच्या समन्वयासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथे स्वतंत्र समन्वय कक्ष कार्यान्वित करण्यात येणार आहे. विद्यार्थी, उमेदवार, संस्था, तज्ज्ञ आणि अन्य संबंधित घटकांना आपल्या सूचना व अभिप्राय गुरुवार दिनांक ११ सप्टेंबर पर्यंत Pune-ExamReformsTaskforce@maharashtra.gov.in या ई-मेलवर पाठविता येतील.

प्राप्त सूचना व प्रत्यक्ष संवादासाठी आलेल्या विनंत्यांचा आढावा घेऊन सल्लामसलतीच्या नियोजनानुसार संबंधित व्यक्ती व संस्थांना शुक्रवार, १२ सप्टेंबर रोजी चर्चेची वेळ कळविण्यात येणार आहे. प्रश्नपत्रिका व परीक्षा केंद्र व्यवस्थापन, परीक्षा प्रक्रियेची सुरक्षितता व विश्वासार्हता, तंत्रज्ञानाचा वापर, उमेदवारांशी संवाद, तक्रार निवारण, परीक्षा अनुभव तसेच भरती परीक्षा पद्धतीशी संबंधित इतर बाबींवरही सूचना व चर्चा करता येणार आहे, असे जिल्हा प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बिबवेवाडीत ‘श्री उवसग्गहरं स्तोत्र’चे सामुदायिक पठण; हजारो भाविकांचा सहभाग

रसिकलालजी एम. धारीवाल फाऊंडेशनचा उपक्रम; साधू-साध्वींच्या सान्निध्यात भक्तिमय वातावरण पुणे...

शाहरुख खानच्या ‘किंग’चे शूटिंग पूर्ण; अंतिम कट, गाणी आणि VFXचे काम अद्याप सुरू

ॲक्शन सीक्वेन्सची लांबी, संगीत आणि साउंड डिझाइनवर अंतिम निर्णय...

‘मिर्झापूर द मूव्ही’चा बॉक्स ऑफिसवर भौकाल; ₹25.75 कोटींच्या ओपनिंगसह एक्सेलचा नवा विक्रम

‘गोल्ड’, ‘रईस’, ‘गली बॉय’ला टाकले मागे; एक्सेल एंटरटेनमेंटच्या 25...