आत्महत्येची संकटलक्षणे ओळखण्यासाठी एमआयएमएचतर्फे प्रशिक्षण कार्यशाळा

Date:

महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्थेतर्फे ११ सप्टेंबरला पाषाण येथे एकदिवसीय प्रशिक्षण

पुणे : महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्था (शासकीय) यांच्या वतीने आत्महत्येची संकटलक्षणे वेळीच ओळखणे आणि संकटग्रस्त व्यक्तीला योग्य मदतीशी जोडण्यासाठी आवश्यक कौशल्ये विकसित करण्याच्या उद्देशाने ११ सप्टेंबर रोजी एकदिवसीय आत्महत्या प्रतिबंधक नियंत्रक प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती संस्थेचे सहयोगी प्राध्यापक डॉ. प्रफुल्ल कापसे यांनी दिली.

ही कार्यशाळा पाषाण येथील महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्थेत होणार असून विद्यार्थी, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते, स्वयंसेवक तसेच आरोग्य क्षेत्रातील व्यक्तींना यात सहभागी होता येणार आहे.

मानसिक आरोग्याविषयी जनजागृती करणे, आत्महत्येच्या धोक्याची लक्षणे वेळेत ओळखणे आणि संकटात असलेल्या व्यक्तीला योग्य उपचार व मदत मिळवून देण्यासाठी आवश्यक कौशल्ये विकसित करणे हा या प्रशिक्षणाचा प्रमुख उद्देश आहे. मानसिक आरोग्याच्या समस्यांकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याबरोबरच संकटाच्या काळात संबंधित व्यक्तीला आवश्यक भावनिक आणि व्यावसायिक आधार कसा मिळवून द्यायचा, याचे मार्गदर्शनही प्रशिक्षणात केले जाणार आहे.

स्वयंसेवकांपासून आरोग्य व्यावसायिकांपर्यंत सहभाग

या प्रशिक्षणात स्वयंसेवक, विद्यार्थी, संशोधक, शिक्षक, प्राध्यापक, आरोग्य क्षेत्रातील व्यावसायिक, सामाजिक कार्यकर्ते, मानसशास्त्रज्ञ आणि स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी सहभागी होऊ शकणार आहेत. तसेच संकटग्रस्त व्यक्तींना मदत करण्याची इच्छा असलेल्या नागरिकांनाही प्रशिक्षणासाठी नोंदणी करता येणार आहे.

प्रशिक्षणादरम्यान आत्महत्या प्रतिबंधासाठी आवश्यक कौशल्यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शन केले जाणार आहे. मानसिक आरोग्याशी संबंधित समस्या वेळीच ओळखणे, योग्य वेळी हस्तक्षेप करणे आणि गरजू व्यक्तीला आवश्यक वैद्यकीय अथवा मानसोपचार मदतीशी जोडणे याबाबतही माहिती दिली जाणार आहे.

या प्रशिक्षणाच्या माध्यमातून मानसिक आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ, व्यावसायिक आणि विविध संस्थांशी संवाद साधण्याची संधी सहभागी व्यक्तींना मिळणार आहे. प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या सहभागींना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

या कार्यक्रमासाठी पूर्वनोंदणी आवश्यक असून समाजातील अधिकाधिक नागरिकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन डॉ. प्रफुल्ल कापसे यांनी केले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

१४ वर्षांनंतर शिक्षक पुरस्काराची परंपरा पुन्हा सुरू; ४२ शिक्षकांचा सन्मान

अंतर्मुख होऊन विचार करण्यास प्रवृत्त करणाऱ्या शिक्षणांची गरज- ना....

दहीहंडीच्या स्टेजची लोखंडी कमान अंगावर पडून महिलेचा मृत्यू

जुनी सांगवीतील घटना; कार्यक्रम संपल्यानंतर कमान उतरवताना अपघात, सांगवी...

परदेशी पाहुण्यांची माहिती देण्यास विलंब; पुण्यातील जेडब्ल्यू मेरियट, शेरटन ग्रँडवर गुन्हा

जेडब्ल्यू मेरियटकडून तब्बल ९४७ तास, तर शेरटन ग्रँडकडून ३३७...