उत्सवांतील उपद्रव म्हणून डीजे-ध्वनीप्रदूषण अशा चर्चांना उधाण ; विद्यानंद बापट केंद्रस्थानी, समर्थन-टीका दोन्ही वाढले

Date:

उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन; डीजे-लेझरवर कठोर कारवाईचा इशारा, प्रकरण मानवाधिकार आयोगापर्यंत पोहोचले

पुणे : उत्सवांतील काळात डीजे आणि ध्वनीप्रदूषणाच्या मुद्द्यावरून मोठा वाद निर्माण झाला असून, या वादाच्या केंद्रस्थानी विद्यानंद बापट हे नाव आले आहे. महापालिकेच्या बैठकीनंतर बापट यांचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, त्यांनी मांडलेल्या भूमिकेमुळे शहरात समर्थन आणि विरोध अशा दोन्ही प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. विद्यानंद बापट यांनी आपण नास्तिक असल्याचे स्पष्ट करताना, प्रत्येकाला धर्मस्वातंत्र्य आहे; मात्र कोणताही उत्सव साजरा करताना सर्वसामान्य नागरिकांना त्रास होणार नाही, याची काळजी घेणे तितकेच आवश्यक असल्याची भूमिका मांडली. गणेशोत्सवाच्या नावाखाली होणारे कर्णकर्कश ध्वनीप्रदूषण, डीजे संस्कृती आणि त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर होणारे परिणाम या मुद्द्यांवर त्यांनी आक्षेप घेतला आहे.ध्वनीप्रदूषणमुक्त गणेशोत्सवाची मागणी करणाऱ्या अनेक पुणेकरांचा त्यांना पाठिंबा मिळत आहे.

तर बापट यांच्या या भूमिकेनंतर काही विरोधकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. पुण्याच्या गणेशोत्सवाबाबत त्यांनी बोलू नये, असा आक्षेप घेत त्यांच्यावर सोशल मीडियावरूनही टीका होत आहे. नारायण पेठेतील बापट विरुद्ध सदाशिव पेठेचे महाजन आणि कोथरूडचे कुलकर्णी असा स्वरूपाचा वाद आता रंगू लागल्याचे चित्र आहे.दरम्यान, सोशल मीडियावर विद्यानंद बापट यांची ‘तापट बापट’ अशी ओळख तयार होत असून, गणेशोत्सव हा सांस्कृतिक आणि पारंपरिक पद्धतीने साजरा व्हावा, डीजेच्या कर्णकर्कश आवाजाने नव्हे, अशी भूमिका मांडणारा एक गट बापट यांच्या पाठीशी उभा राहताना दिसत आहे.

या सर्व घडामोडींमध्ये प्रशासनानेही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी गणेशोत्सवात डीजे आणि लेझरचा वापर केल्यास थेट गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा दिला आहे. तसेच, पुणेकरांनी आपला गणेशोत्सव पारंपरिक आणि सांस्कृतिक पद्धतीने साजरा करून दाखवावा, असे आवाहनही प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात ध्वनीप्रदूषणाचा मुद्दा अधिक तीव्रतेने पुढे येण्याची शक्यता आहे.

डीजेच्या मुद्द्यावरून सुरू झालेला हा वाद आता वैयक्तिक आरोप-प्रत्यारोपांपर्यंत पोहोचला आहे. पुण्यातील शिक्षणतज्ज्ञ धनंजय कुलकर्णी यांनी विद्यानंद बापट यांच्यावर गंभीर आरोप करत, ते अराजकवादी आणि नक्षली मानसिकतेचे असल्याचे म्हटले आहे. तसेच धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणीही करण्यात आली आहे. शशांक महाजन यांनीही बापट यांनी केवळ डीजे आणि ध्वनीप्रदूषणाच्या मुद्द्यावर बोलावे, पण पुण्याच्या गणेशोत्सवाला लक्ष्य करू नये, असे सुनावले आहे.या पार्श्वभूमीवर विद्यानंद बापट यांच्याविरोधात पोलिसांत अधिकृत तक्रार दाखल करण्याची तयारी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे हा वाद केवळ मतभेदांपुरता मर्यादित न राहता कायदेशीर स्तरावरही जाण्याची चिन्हे दिसत आहेत.

दरम्यान, ध्वनीप्रदूषणाविरोधातील ही लढाई आता केवळ सोशल मीडियापुरती किंवा स्थानिक चर्चापुरती राहिलेली नाही. डेक्कन जिमखाना परिसरात राहणारे शरद केळकर यांनीही या मोहिमेला पाठिंबा देत थेट राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे धाव घेतली आहे. ऐतिहासिक गणेशोत्सवाच्या काळात होणाऱ्या कर्णकर्कश ध्वनीप्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर आणि मूलभूत अधिकारांवर परिणाम होत असल्याचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी अधिकृत तक्रार दाखल केली आहे.

शरद केळकर यांच्या तक्रारीची गंभीर दखल घेत राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला (MPCB) कारणे दाखवा नोटीस बजावल्याची माहिती समोर आली आहे. या नोटीसमुळे हा प्रश्न आता प्रशासकीय, कायदेशीर आणि मानवी हक्कांच्या चौकटीतही महत्त्वाचा ठरत आहे. त्यामुळे गणेशोत्सवातील डीजे, ध्वनीप्रदूषण आणि नागरिकांच्या हक्कांचा प्रश्न यंदा अधिक तीव्रतेने पुढे येणार, हे स्पष्ट झाले आहे.

एकीकडे परंपरा, श्रद्धा आणि उत्सवाची बाजू मांडली जात आहे, तर दुसरीकडे नागरिकांचे आरोग्य, ध्वनीप्रदूषणाचे दुष्परिणाम आणि कायद्याचे पालन या मुद्द्यांवर आवाज उठवला जात आहे. त्यामुळे पुण्यातील गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेला हा वाद आगामी काळात आणखी तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

जेवढा आवाज दाबाल, तेवढाच ‘संतोष’ उफाळून येईल”; प्रशांत जगतापांचा सरकारला इशारा

संतोष पंडितांची अटक चुकीची असल्याचा आरोप; गुन्हा मागे घेण्याची...

पडळकरांना जाब विचारला अन दुसऱ्याच दिवशी संतोष पंडितांना मध्यरात्री अटक

चंद्रकांत पाटील यांच्याबाबत आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारित केल्याचा आरोप; कोथरूड...

काँग्रेस जिल्हाध्यक्षांच्या शिबिराचा राहुल गांधींच्या उपस्थितीत समारोप.

राहुल गांधींनी घेतली जिल्हाध्यक्षांच्या कुटुंबियांशी भेट, आदिवासी विद्यार्थ्यांशीही साधला...

दीप्ती चवधरी यांच्या कार्यअहवालाचे राहुल गांधी यांच्या हस्ते प्रकाशन.

पुणे- लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस पक्षाचे युवा नेते ...