विमानाची वेळ वारंवार बदलली;पुण्यातील प्रवाशांना ₹१२,४०० चा भुर्दंड

Date:

विमान कर्मचाऱ्यांच्या कथित मुजोर वर्तनाचीही तक्रार; भरपाईसह कारवाईची मागणी

पुणे : विमानाच्या वेळेत वारंवार बदल आणि विमान कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या कथित गैरवर्तनाचा फटका पुण्यातील प्रवाशांना बसल्याचा प्रकार समोर आला आहे. दिल्लीहून पुण्याला येणाऱ्या स्पाइसजेटच्या ‘एसजी ९३९’ विमानाची वेळ वारंवार पुढे ढकलण्यात आल्याने प्रवाशांना रात्रभर दिल्लीत अडकून राहावे लागले. यामुळे हॉटेल, जेवण आणि प्रवासापोटी सुमारे १२ हजार ४०० रुपयांचा अतिरिक्त खर्च सहन करावा लागल्याची तक्रार करण्यात आली आहे.

सोमवारी (ता. ३१ ऑगस्ट) दिल्लीहून पुण्याकडे येणारे हे विमान सायंकाळी ४.५५ वाजता उड्डाण करणार होते. मात्र, त्यानंतर विमानाची वेळ वारंवार बदलण्यात आल्याचा प्रवाशांचा आरोप आहे. सुरुवातीला पहाटे ४ वाजता, त्यानंतर ६ वाजता, ८.३० आणि अखेर ९.३० वाजेपर्यंत वेळ पुढे ढकलण्यात आल्याने प्रवाशांना मोठा मनःस्ताप सहन करावा लागला.

सामानाच्या वजनावरून वाद

दरम्यान, १ सप्टेंबर रोजी दिल्ली विमानतळावर चेक-इन करताना सामानाच्या वजनावरूनही वाद झाल्याचे प्रवाशांनी म्हटले आहे. लेह येथून तेच सामान घेऊन प्रवास केल्याचे सांगूनही उपस्थित वरिष्ठ अधिकाऱ्याने अयोग्य आणि अपमानास्पद भाषा वापरल्याचा आरोप करण्यात आला आहे.

‘फालतू माणसे’ असा उल्लेख करत ‘तिकीट लॉक करून कसे जाता ते पाहतो’ अशा शब्दांत धमकी दिल्याचा आरोपही प्रवाशांनी आपल्या तक्रारीत केला आहे. या आरोपांबाबत संबंधित विमान कंपनीची अधिकृत भूमिका समोर आलेली नाही.

नुकसानभरपाईची मागणी

या संपूर्ण प्रकाराबाबत प्रवासी अॅड. सतीश गोरडे आणि अॅड. सायली गोरडे यांनी तक्रार दाखल केली असून, झालेल्या अतिरिक्त खर्चाची परतफेड, नुकसानभरपाई तसेच संबंधित अधिकाऱ्यावर प्रशासकीय कारवाई करण्याची मागणी केली आहे.

मागण्यांवर योग्य कार्यवाही न झाल्यास ग्राहक न्यायालयात दाद मागण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

गणेशोत्सवात यंदा ध्वनिप्रदूषण निश्चितच कमी होईल : पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचे मत

मानाचा दुसरा श्री तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे ‘ग्रामदेवता...

महाराष्ट्राच्या ऊर्जा विभागाच्या दालनाला सर्वोत्कृष्ट नाविन्यपूर्ण स्टॉलचा पुरस्कार

नवी दिल्लीतील जागतिक परिषदेमध्ये ऊर्जा प्रदर्शनीला मोठा प्रतिसाद मुंबई: नवी दिल्ली...