गणेशोत्सवात यंदा ध्वनिप्रदूषण निश्चितच कमी होईल : पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचे मत

Date:

मानाचा दुसरा श्री तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे ‘ग्रामदेवता पुरस्कार’ प्रदान

पुणे : पुण्यनगरीतील मानाचा दुसरा गणपती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे यंदाचा ‘ग्रामदेवता पुरस्कार’ दिव्यांगांना कृत्रिम हात, पाय व कॅलीपर्स मोफत बसविणाऱ्या नवभारत विकास फाउंडेशन (संलग्न – भारत विकास परिषद) या संस्थेला प्रदान करण्यात आला. तसेच समाजोपयोगी कार्यासाठी बहुमूल्य योगदान देणाऱ्या एकता मित्र मंडळ ट्रस्ट, अरण्येश्वरनगर आणि अभिनव कलाभारती यांना ‘सेवाव्रत गौरव’ देऊन सन्मानित करण्यात आले. स.प. महाविद्यालयाच्या लेडी रमाबाई सभागृहात पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. पुरस्कार सोहळ्याचे अध्यक्षस्थान पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी भूषविले. प्रमुख पाहुणे म्हणून कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने आणि उद्योजक पुनीत बालन व श्री कसबा गणपती गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे उपस्थित होते. यावेळी मंडळाचे अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी, प्रशांत टिकार, केशव नेऊरगावकर, अभिजीत बर्वे यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी तसेच पुण्यातील प्रमुख गणपती मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.

पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, यंदाच्या गणेशोत्सवात ध्वनिप्रदूषण कमी करण्यासाठी गणेश मंडळांकडून सकारात्मक भूमिका घेतली जात आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा ध्वनिप्रदूषण निश्चितच कमी होईल, अशी अपेक्षा आहे. गणेश मंडळांशी संघर्ष करण्याची पोलिसांची कोणतीही भूमिका नाही. उलट, नियमांचे पालन करून उत्साहात गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मंडळांनी सहकार्य करावे. पुणेकर नागरिकांना मी आश्वस्त करतो की, यंदा ध्वनिप्रदूषणाच्या बाबतीत निश्चितच सुधारणा दिसून येईल.

ते पुढे म्हणाले, गणेशोत्सवातील डीजे आणि ध्वनिप्रदूषणाच्या मुद्द्यावर सध्या चर्चा सुरू आहे. याबाबत पोलिसांची भूमिका स्पष्ट असून, डेसिबलच्या निर्धारित मर्यादेचे पालन करणे ही सर्वांचीच जबाबदारी आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे.

गणेशोत्सव हा पुण्याच्या सांस्कृतिक परंपरेचा महत्त्वाचा भाग आहे. प्रत्येकाला नियमांच्या चौकटीत सण-उत्सव साजरा करण्याचा पूर्ण अधिकार आहे. मात्र, त्याचवेळी सर्वसामान्य नागरिकांना होणाऱ्या त्रासाचाही विचार करणे आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

विमानाची वेळ वारंवार बदलली;पुण्यातील प्रवाशांना ₹१२,४०० चा भुर्दंड

विमान कर्मचाऱ्यांच्या कथित मुजोर वर्तनाचीही तक्रार; भरपाईसह कारवाईची मागणी पुणे...

महाराष्ट्राच्या ऊर्जा विभागाच्या दालनाला सर्वोत्कृष्ट नाविन्यपूर्ण स्टॉलचा पुरस्कार

नवी दिल्लीतील जागतिक परिषदेमध्ये ऊर्जा प्रदर्शनीला मोठा प्रतिसाद मुंबई: नवी दिल्ली...

पुण्यात CNG दरात 2 रुपयांची वाढ; आता प्रतिकिलो 97.75 रुपये

पुणे : पश्चिम आशियातील वाढलेला तणाव आणि त्याचा परिणाम...