जमीन विकल्याच्या रागातून वृद्ध आई-वडिलांना मुलांची मारहाण

Date:

इंदापूर तालुक्यातील तरंगवाडीतील घटना; दोघांविरोधात गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर संताप

पुणे : आईच्या नावावरील जमीन विकल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून दोन मुलांनी आपल्या वृद्ध आई-वडिलांना लाकडी दांडक्याने मारहाण केल्याची धक्कादायक घटना इंदापूर तालुक्यातील तरंगवाडी येथे घडली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे. याप्रकरणी इंदापूर पोलिस ठाण्यात दोन्ही मुलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना रविवार, ३० ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. संजय तुकाराम राऊत आणि राजेंद्र तुकाराम राऊत अशी गुन्हा दाखल झालेल्या मुलांची नावे आहेत. त्यांचे वडील तुकाराम किसन राऊत (वय ६५) यांनी याबाबत पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

पत्नीसमवेत फिरायला गेले असताना वाद

तुकाराम राऊत हे पत्नी अंजना यांच्यासोबत सरस्वतीनगर परिसरात राहतात. त्यांची दोन्ही मुले स्वतंत्रपणे आपल्या कुटुंबासह राहतात. रविवारी सायंकाळी तुकाराम राऊत हे आजारी पत्नी अंजना यांच्यासोबत तरंगवाडी गावच्या हद्दीत फिरण्यासाठी गेले होते.

सायंकाळी साडेसहाच्या सुमारास दोन्ही मुले टाटा नेक्सॉन कारमधून तेथे आली. “आईच्या नावावरील जमीन का विकली?” असा जाब त्यांनी आई-वडिलांना विचारल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. याच कारणावरून वाद वाढत गेला आणि त्यानंतर दोन्ही मुलांनी आई-वडिलांना लाकडी दांडक्याने मारहाण केल्याचा आरोप आहे.

तसेच, विकलेली जमीन परत घ्या, अन्यथा परिणाम भोगावे लागतील, अशी धमकीही दिल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

मारहाणीत तुकाराम राऊत यांच्या पाठीत, तोंडावर, दोन्ही मांडीवर आणि डाव्या खांद्याला दुखापत झाली. तर अंजना राऊत यांच्या उजव्या हाताच्या मनगटाजवळ आणि कमरेला मार लागल्याचे तक्रारीत नमूद आहे.

व्हिडीओ व्हायरल; वृद्ध महिला करत होती विनवणी

या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये वृद्ध दाम्पत्य रस्त्यावर असून जवळ पांढऱ्या रंगाची कार उभी असल्याचे दिसते. दोन व्यक्ती त्यांच्यासमोर उभ्या असून, त्यापैकी एका व्यक्तीच्या हातात काठी असल्याचे दिसून येते.

वृद्ध व्यक्तीला मारहाण होत असताना महिला पतीला मारू नका, अशी विनवणी करत असल्याचेही व्हिडीओमध्ये दिसते. भांडणाचा आवाज ऐकून परिसरातील नागरिक घटनास्थळी जमा झाले आणि त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली.

तुकाराम राऊत यांच्या फिर्यादीवरून संजय राऊत आणि राजेंद्र राऊत यांच्याविरोधात इंदापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करत आहेत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महात्मा फुले यांचे कार्य अद्याप अपूर्ण; समता व शिक्षणाची चळवळ पुढे नेण्याची जबाबदारी शिक्षकांची : डॉ. नीलम गोऱ्हे

द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त २०१ व्याख्यानांच्या उपक्रमाचा शुभारंभ; एक लाख विद्यार्थ्यांपर्यंत...

ब्राह्मण समाजाच्या प्रलंबित प्रश्नांवर लक्ष घालणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे ब्राह्मण समाजाच्या शिष्टमंडळाला आश्वासन मुंबई : महाराष्ट्रातील...

प्रभाग २९ मध्ये  “सांस्कृतिक गणेशोत्सव” साजरा करणाऱ्या मंडळांना क्रिएटिव्ह फाउंडेशन लोकोपयोगी साहित्य भेट देणार – संदीप खर्डेकर.

पुणे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आवाहनानुसार सांस्कृतिक गणेशोत्सव...

आयुक्तसाहेब…४ बेस-टॉप चा निर्णय घेण्यापूर्वी नागरिकांशी बोललात काय ?

मंडळांच्या कार्यकर्त्यांशी चर्चा, मुख्यमंत्र्यांशीही संवाद; मात्र कर्णकर्कश आवाजाचा त्रास...