पुणे | ३१ ऑगस्ट २०२६
PMC मधील JE भरती परीक्षेतील गंभीर अनियमितता आणि IBPS अहवालाच्या निषेधार्थ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन दादा सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस तथा रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे अध्यक्ष धनंजय रामकृष्ण शिंदे यांच्या नेतृत्वाखाली, शेकडो विद्यार्थी आज सकाळपासून PMC मुख्यालयाच्या गेटबाहेर ठिय्या आंदोलन करत आहेत.
IBPS अहवालात काही scores “non-genuine” असल्याचे आणि परीक्षेदरम्यान unfair means ची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे परीक्षा प्रक्रियेच्या विश्वासार्हतेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
आंदोलनादरम्यान धनंजय शिंदे यांनी विद्यार्थ्यांसह अॅड. असीम सरोदे यांची भेट घेतली. PMC आयुक्तांना अॅड. सरोदे यांच्या माध्यमातून कायदेशीर नोटीस देऊन पुढील न्यायालयीन लढ्याची तयारी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
काँग्रेसच्या प्रमुख मागण्या:
- PMC JE परीक्षा रद्द करून फेरपरीक्षा घ्यावी.
- उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली स्वतंत्र चौकशी करावी.
- १४६ नियुक्त्यांचा फेरविचार करून joining स्थगित करावी.
- CCTV, server logs, biometric व सर्व digital evidence सुरक्षित करावे.
- IBPS, TCS व E&Y च्या technical findings चे स्वतंत्र forensic परीक्षण करावे.
- गैरप्रकार सिद्ध झाल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करावी.
धनंजय शिंदे म्हणाले:
“महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन दादा सपकाळ यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनाखाली ही लढाई कोणत्याही उमेदवाराविरोधात नाही; हजारो प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी आहे. प्रशासनाने न्याय दिला नाही तर काँग्रेस विद्यार्थ्यांसोबत रस्त्यावरही लढेल आणि न्यायालयातही लढेल. न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरूच राहील.”

