अभ्यासनाट्याची चळवळ एकत्रितरित्या पुढे न्यावी : डॉ. न. म. जोशी

Date:

वर्तन परिवर्तनाचे उद्दिष्ट अभ्यासनाट्यातून साध्य होईल : डॉ. न. म. जोशी

प्रकाश पारखी लिखित ‘शालेय नाट्यसंस्कार’ पुस्तकाचे प्रकाशन

पुणे : अभ्यासनाट्य चळवळ शालेय अभ्यासक्रमातील प्रत्येक विषयाच्या आकलनासाठी उपयुक्त आणि प्रभावी आहे. अभ्यासनाट्याच्या माध्यमातून वर्तन परिवर्तनाचे उद्दीष्ट परिणामकारकरीत्या साध्य होऊ शकते. त्यामुळे नाट्यसंस्कार बरोबरच शिक्षणसंस्था, शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांनी ही चळवळ एकत्रित प्रयत्नांनी पुढे न्यावी, असे आवाहन ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. न. म. जोशी यांनी रविवारी येथे केले.

नाट्यसंस्कार कला अकादमी आयोजित अभ्यासनाट्य या संकल्पनेवर आधारीत विशेष कार्यक्रमात डॉ. न. म. जोशी बोलत होते. अकादमीचे प्रमुख विश्वस्त प्रकाश पारखी, शिक्षण प्रसारक मंडळीचे अध्यक्ष सुधीर काळकर, शिक्षण अभ्यासक ज्योती केमकर, नाट्यसंस्कार च्या विश्वस्त दीपाली निरगुडकर, संध्या कुलकर्णी व्यासपीठावर होते. प्रकाश पारखी लिखित ‘शालेय नाट्यसंस्कार’ या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. जोशी तसेच मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सदाशिव पेठेतील पेरूगेट भावे स्कूलमधील प्र. ल. गावडे सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

नाट्यसंस्कार कला अकादमीतर्फे गेली अनेक वर्षे पुण्यात आंतरशालेय अभ्यासनाट्य स्पर्धा घेतल्या जातात. यावर्षी या स्पर्धा  सप्टेंबर -ऑक्टोबर महिन्यात होणार आहेत त्याला जास्तीत जास्त शाळांनी प्रतिसाद द्यावा असे आवाहन या वेळी करण्यात आले.

डॉ. न. म. जोशी म्हणाले, प्रकाश पारखी यांनी अभ्यासनाट्य ही संकल्पना मांडून, शाळाशाळांमध्ये ती चळवळ स्वरूपात पुढे चालवली आहे. शैक्षणिक अभ्यासक्रमात ही संकल्पना उपयुक्त आणि प्रभावी ठरत आहे. पारखी यांनी या पुस्तकाच्या रूपाने जणु शैक्षणिक सिद्धांतांचे सुगम, कुणालाही करता येईल, असे प्रात्यक्षिक दाखवले आहे, ते पुढे नेण्याची जबाबदारी आपली आहे.

सुधीर काळकर म्हणाले, नव्या शैक्षणिक धोरणानुसार भारतीय ज्ञानप्रणालीअंतर्गत नाटक, अभिनय हे केवळ मनोरंजन नव्हे तर, विद्यार्थ्यांमधील कृतीशीलता जागवणारे मार्ग आहेत.  नाट्यसंस्कार च्या या अभ्यासनाट्य उपक्रमातून विद्यार्थी विषय तर समजून घेतीलच, पण सभाधीटपणा, उच्चारांची अचूकता, प्रसंगावधान, पाठांतरकौशल्य, संवाद साधण्याची कला अशी कित्येक कौशल्येही त्यांच्यापाशी येतील, जी भावी आयुष्यातही उपयुक्त ठरतील.

ज्योती केमकर यांनी अभ्यासनाट्यातून शालेय नाट्यसंस्कार या पुस्तकाचे विविध भाषांत अनुवाद होण्याची आवश्यकता अधोरेखित केली. विद्यार्थ्यांमधील अभ्यासाची गोडी, आवड कमी होत असताना, अभ्यासनाट्याद्वारा ती पुन्हा निर्माण करणे शक्य आहे. नाटक ही कला स्नेहसंमेलनापुरती न ठेवता, नित्य गोष्ट म्हणून पुढे आल्यास प्रत्येक विषय विद्यार्थ्यांना नेमकेपणाने समजण्यास साह्य करतील.

प्रकाश पारखी यांनी प्रास्ताविकात वर्गनाट्यगृहाची संकल्पना आणि अभ्यासनाट्य कार्यशाळांची व्याप्ती राज्यभर वाढविण्याची गरज प्रतिपादन केली. या उपक्रमाला चळवळ, अभियानाचे रूप मिळावे, विद्यार्थ्यांना संकल्पना स्पष्ट व्हाव्यात आणि व्यक्तिमत्त्वविकासाची संधीही मिळावी, असा उद्देश यामागे आहे, असे ते म्हणाले.

संध्या कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले. सुरवातीला शालेय विद्यार्थ्यांनी 2025 मधील आंतरशालेय अभ्यासनाट्य स्पर्धेतील पारितोषिकप्राप्त नाटिकांचे सादरीकरण केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मनुस्मृतीच्या प्रती जाळून भाजपच्या मनुवादी वृत्तीचा मुंबई युवा काँग्रेसकडून तीव्र निषेध

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या सभेनंतर ‘शुद्धीकरण’ करणाऱ्या भाजप-आरएसएसच्या...

पुणे जिल्ह्यात प्रारूप मतदार यादीत ६२.१३ लाख मतदार; २८.६६ लाख मतदार ‘अनकलेक्टेबल’

२१ विधानसभा मतदारसंघांची प्रारूप यादी प्रसिद्ध; १३.३२ लाख प्रकरणांवर...

गणेशोत्सवासाठी पुणे जिल्ह्यात २७ विशेष कार्यकारी दंडाधिकारी नियुक्त

पुणे, दि .३१ : आगामी गणेशोत्सव शांततेत आणि सुरळीत...