ध्वनी तीव्रतेचा त्रास पुणेकरांना होऊ न देणे ही महापौरांची जबाबदारी…त्या तर कार्यकर्त्यांना पाठीशी घालताहेत

Date:

ध्वनी प्रदूषणावरून महापौरांवर ‘आप’चा निशाणा

“कार्यकर्त्यांना पाठीशी घालण्याऐवजी कायद्याची अंमलबजावणी करा”; डीजे-डॉल्बीच्या कर्णकर्कश आवाजाला विरोध करणाऱ्या पुणेकरांच्या मागणीला आम आदमी पार्टीचा पाठिंबा

पुणे : गणेशोत्सवातील डीजे, डॉल्बी आणि कर्णकर्कश ध्वनीवर्धकांच्या वापरावरून पुण्यातील वातावरण तापू लागले आहे. ध्वनी प्रदूषणाविरोधात रविवारी नागरिकांनी आंदोलन केल्यानंतर आता आम आदमी पार्टीनेही या मुद्द्यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “ध्वनीच्या तीव्रतेचा त्रास पुणेकरांना होऊ न देणे ही महापौरांची जबाबदारी आहे; मात्र त्या कार्यकर्त्यांना पाठीशी घालत आहेत,” असा आरोप ‘आप’चे राज्य प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी केला आहे.

गेल्या काही वर्षांपासून विविध सण-उत्सवांच्या मिरवणुकांमध्ये मोठ्या आणि कर्णकर्कश आवाजातील ध्वनिवर्धकांवर निर्बंध घालण्याची मागणी पुणेकरांकडून होत असल्याचे ‘आप’ने म्हटले आहे. गणेश मंडळांसोबत झालेल्या बैठकीत प्रशासनाकडून या विषयावर स्पष्ट भूमिका अपेक्षित होती. कायद्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी प्रशासनावर असल्याचे पक्षाने नमूद केले.

महापौर मंजुषा नागपुरे यांनी सोशल मीडियावर मांडलेल्या भूमिकेवरही ‘आप’ने आक्षेप घेतला आहे. “लोकप्रतिनिधींनी कार्यकर्त्यांना पाठीशी घालण्याऐवजी सर्वसामान्य पुणेकरांच्या आरोग्याचा विचार करावा,” अशी भूमिका पक्षाने मांडली. कर्णकर्कश, आरोग्यास घातक आणि नियमबाह्य डीजे-डॉल्बीच्या वापराला विरोध करणाऱ्या नागरिकांच्या मागणीला आम आदमी पार्टीने पाठिंबा जाहीर केला आहे.

ध्वनी प्रदूषणासंदर्भात विविध क्षेत्रांसाठी कायद्याने कमाल ध्वनीमर्यादा निश्चित करण्यात आली असून त्यासंदर्भात न्यायालयीन आदेशही आहेत. त्यामुळे महापालिका आणि पोलीस प्रशासनाने नियमांची काटेकोर अंमलबजावणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

मोठ्या आवाजामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांना त्याचा अधिक त्रास होतो. त्यामुळे उत्सवाचा आनंद साजरा करताना इतर नागरिकांच्या आरोग्याचा आणि शांततेच्या अधिकाराचाही विचार होणे आवश्यक असल्याचे पक्षाने म्हटले आहे.

“सर्व धर्मांचे सण उत्साहाने साजरे झाले पाहिजेत. मात्र त्यासाठी पारंपरिक वाद्ये आणि साधनांना प्राधान्य दिले पाहिजे. पुण्याचा गणेशोत्सव पाहण्यासाठी हजारो नागरिक शहरात येतात. ते सजावट, पारंपरिक वादन आणि सांस्कृतिक वातावरण अनुभवण्यासाठी येतात; मोठ्या डीजे-डॉल्बी किंवा अश्लील नृत्यांसाठी नाहीत,” असे मुकुंद किर्दत यांनी म्हटले

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

DJच्या दणदणाटाला काँग्रेसचा विरोध; धीरज घाटेंच्या वक्तव्यावर प्रशांत जगतापांचा संताप

“गणेशोत्सवाच्या परंपरेचा काँग्रेसला अभिमान; मात्र ध्वनी प्रदूषणाने संस्कृती नासवू...

उत्सवात भक्तिभाव जागला पाहिजे, छातीत धडकी भरता कामा नये…

राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांचे सर्व...

सातव्या थरावरून चिमुकला गोविंदा खाली कोसळला; बदलापूरच्या दहीहंडीत मोठा अनर्थ टळला

सेफ्टी बेल्ट तुटल्याने दुर्घटना; माखन चोर दहीकाला उत्सवातील घटनेने...