उत्सवात भक्तिभाव जागला पाहिजे, छातीत धडकी भरता कामा नये…

Date:

राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांचे सर्व गणेश मंडळांना आवाहन

डीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा! कोरोना काळातील गणेश मंडळांच्या सकारात्मक भूमिकेचीही आठवण

पुणे : गणेशोत्सव हा केवळ धार्मिक नव्हे, तर सामाजिक आणि सांस्कृतिक उत्सव आहे. या उत्सवातील भक्ती, श्रद्धा आणि मांगल्य टिकवून ठेवताना नागरिकांच्या आरोग्याचीही काळजी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे गणेश मंडळांनी डीजे आणि लेझर बीमचा वापर टाळून कायद्याचे पालन करत उत्सव साजरा करावा, पुणेकरांच्या हृदयात भक्तिभाव जागला पाहिजे, छातीत धडकी भरता कामा नये. भक्ती, सामाजिक जाणीव आणि कायद्याचा सन्मान राखून गणरायाचा उत्सव उदंड उत्साहाने साजरा करूया,” असे आवाहन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी एका पत्रकाच्या माध्यमातून पुणेकरांना केले आहे.

गणेशोत्सवात पूर्वी काही अनुचित प्रथा शिरल्या होत्या. त्या दूर करून भक्ती आणि उत्सवाचे पावित्र्य जपण्यासाठी सार्वजनिक गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला. त्यातूनच ढोल-ताशा पथके आणि गणेश मंडळांसमोर सामुदायिक अथर्वशीर्ष पठणासारख्या चांगल्या प्रथा रुजल्या, असे पाटील यांनी पत्रकात नमूद केले.

लोकमान्य टिळकांनी समाजप्रबोधन, लोकहित आणि राष्ट्रहिताच्या उद्देशाने सार्वजनिक गणेशोत्सवाला व्यापक स्वरूप दिले. हा वारसा पुढे नेण्याची जबाबदारी गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांची आहे. डीजे आणि लेझर बीमच्या अतिवापरामुळे ज्येष्ठ नागरिक, रक्तदाबाचे रुग्ण, लहान मुले तसेच रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांना त्रास होऊ शकतो. त्यामुळे अशा प्रकारच्या वापराला भक्तिभावाने काम करणारा कोणताही संवेदनशील गणेश मंडळाचा कार्यकर्ता पाठिंबा देणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

“डीजे हवाच” असा आग्रह धरणारे मोजके लोक आहेत. गणेशोत्सव म्हणजे डीजे, अशी भ्रामक कल्पना गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांच्या मनात नाही. गणेश मंडळांचा कार्यकर्ता हा समाजाचाच घटक असल्याने डीजे आणि लेझरमुळे होणारा त्रास त्यालाही चांगल्या प्रकारे समजतो, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.

कोरोना काळातील गणेश मंडळांनी घेतलेल्या सकारात्मक भूमिकेची ही नामदार पाटील यांनी पत्रकामधून आठवण करुन दिली आहे. कोरोना काळात गणेश मंडळांनी सरकारने घातलेले निर्बंध स्वीकारले. पुण्याची ऐतिहासिक गणेश विसर्जन मिरवणूक रद्द करण्याचा निर्णयही मंडळांच्या कार्यकर्त्यांनी समाजहितासाठी जड अंतःकरणाने स्वीकारला. त्याचप्रमाणे आता निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा करताना नागरिकांच्या आरोग्याची हेळसांड होणार नाही, याची जबाबदारी प्रत्येकाची आहे.

कायद्याने घातलेल्या बंधनांचा सन्मान करणे गरजेचे असून, गणेशोत्सवाची आंतरराष्ट्रीय स्तरावर असलेली सकारात्मक प्रतिमा कायम राखण्यासाठी नकारात्मक बातम्या जगभर जाणार नाहीत, याचीही काळजी घ्यावी. उत्सवातील उत्साहाला बांध नसावा; मात्र त्याचा नागरिकांना त्रास होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन चंद्रकांत पाटील यांनी केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ध्वनी तीव्रतेचा त्रास पुणेकरांना होऊ न देणे ही महापौरांची जबाबदारी…त्या तर कार्यकर्त्यांना पाठीशी घालताहेत

ध्वनी प्रदूषणावरून महापौरांवर ‘आप’चा निशाणा “कार्यकर्त्यांना पाठीशी घालण्याऐवजी कायद्याची अंमलबजावणी...

सातव्या थरावरून चिमुकला गोविंदा खाली कोसळला; बदलापूरच्या दहीहंडीत मोठा अनर्थ टळला

सेफ्टी बेल्ट तुटल्याने दुर्घटना; माखन चोर दहीकाला उत्सवातील घटनेने...

नामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता

पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना...