सातव्या थरावरून चिमुकला गोविंदा खाली कोसळला; बदलापूरच्या दहीहंडीत मोठा अनर्थ टळला

Date:

सेफ्टी बेल्ट तुटल्याने दुर्घटना; माखन चोर दहीकाला उत्सवातील घटनेने गोविंदांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

बदलापूर : दहीहंडी उत्सवात सातव्या थरावर चढलेल्या चिमुकल्या गोविंदाचा सेफ्टी बेल्ट अचानक तुटल्याने तो थेट खाली कोसळल्याची धक्कादायक घटना बदलापूरमध्ये घडली. चिमुकल्याला तातडीने उपचारासाठी नेण्यात आले. या घटनेमुळे काही काळ उपस्थितांमध्ये मोठी खळबळ उडाली.

बदलापूर येथे आयोजित ‘माखन चोर दहीकाला उत्सवा’त हा प्रकार घडला. दहीहंडी फोडण्यासाठी आलेल्या गोविंदा पथकाने सात थरांची मानवी मनोरे रचले होते. सातव्या थरावर पोहोचलेल्या चिमुकल्या गोविंदाने सलामी दिली. त्यानंतर हंडी फोडण्याची तयारी सुरू असतानाच त्याचा सेफ्टी बेल्ट तुटला आणि तो उंचावरून खाली कोसळला. अचानक घडलेल्या या घटनेने उपस्थितांच्या काळजाचा ठोका चुकला.

घटनेनंतर चिमुकल्याला तातडीने उपचारासाठी नेण्यात आले. मोठा अनर्थ टळला असला तरी त्याच्या प्रकृतीबाबत अधिकृत माहिती उपलब्ध झाल्यानंतरच नेमकी स्थिती स्पष्ट होईल. सेफ्टी बेल्ट नेमका कशामुळे तुटला, हेही अद्याप स्पष्ट झालेले नाही. आयोजकांकडून घटनेची माहिती घेतली जात आहे.

दहीहंडीमध्ये उंच मानवी मनोरे रचताना गोविंदांच्या सुरक्षेसाठी सेफ्टी बेल्ट, मॅट आणि इतर सुरक्षात्मक साधनांचा वापर केला जातो. मात्र या घटनेत सुरक्षेसाठी वापरण्यात आलेला बेल्टच तुटल्याने या साधनांची गुणवत्ता आणि तपासणीचा मुद्दा पुन्हा समोर आला आहे.

यंदा 5 सप्टेंबर रोजी दहीहंडी उत्सव साजरा होणार आहे. मुंबई, ठाण्यासह राज्यातील अनेक ठिकाणी मोठ्या दहीहंडींचे आयोजन केले जाते. लाखोंची बक्षिसे आणि अधिकाधिक थर लावण्याच्या स्पर्धेमुळे गोविंदांच्या सुरक्षेची पुरेशी खबरदारी घेण्याची गरज या घटनेनंतर पुन्हा अधोरेखित झाली आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ध्वनी तीव्रतेचा त्रास पुणेकरांना होऊ न देणे ही महापौरांची जबाबदारी…त्या तर कार्यकर्त्यांना पाठीशी घालताहेत

ध्वनी प्रदूषणावरून महापौरांवर ‘आप’चा निशाणा “कार्यकर्त्यांना पाठीशी घालण्याऐवजी कायद्याची अंमलबजावणी...

उत्सवात भक्तिभाव जागला पाहिजे, छातीत धडकी भरता कामा नये…

राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांचे सर्व...

नामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता

पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना...